मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पाचव्या टप्प्याचं लोकार्पण, ७०१ कि.मी मार्ग लोकांसाठी खुला

Written by:Astha Sutar
Published:
समृद्धी महामार्गासह ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील दक्षिणेकडील पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पणही पार पडले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रकल्प तयार केला आहे. या मार्गामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक जलदगतीने आणि सुखकर होणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पाचव्या टप्प्याचं लोकार्पण, ७०१ कि.मी मार्ग लोकांसाठी खुला

Samruddhi Expressway Inauguration : जर तुम्ही मुंबई नाशिक प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आता मुंबई-नाशिक अंतर फक्त अडीच तासात गाठता येणार आहे. समृद्धी महामार्गाचा अखएरच्या आणि पाचव्या टप्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण झाले. इगतपुरी ते ठाण्यातील आमणे अशा 76 किलोमीटरच्या मार्गाचं लोकार्पण आज करण्यात आले. त्यामुळं संपूर्ण महामार्ग सामान्य लोकांसाठी खुला झाला आहे.

फडणवीस-शिंदेंनी केलं सारथ्यं…

दरम्यान, इगतपुरी येथे बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर लोकार्पणाचा सोहळा पार पडला. लोकार्पणाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारने या बोगद्यातून प्रवास केला. तसेच सुरुवातील एकनाथ शिंदेंनी गाडी चालवत सारथ्यं केलं. तर यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवली. यावेळी मी मागच्या सीटवर मला गारगार वाटतंय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. ७०१ किमी लांबीचा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यामुळे आता नागपूर ते मुंबईत १६ तासांचा प्रवास आता आठ तासांवर आला आहे.

महामार्ग किती तालुक्यांना जोडणार…

दुसरीकडे समृद्धी महामार्गाचे देवंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते. या महामार्गामुळं राज्याच्या विकासाला गती मिळेल, कृषी, पर्यावरण, रोजगार यांना चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तर हा महामार्ग राज्यातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जाणाऱ्या सहा पदरी शीघ्रगती महामार्ग आहे. दरम्यान, एमएसआरडीसीने ५५ हजार कोटी रुपये खर्च करून हा ७०१ किमी लांबीचा मार्ग तयार करण्यात आला आहे.