लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, लष्करी-नागरी समन्वयाबाबत चर्चा

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
या बैठकीत नागरी-लष्करी सहकार्य, अंतर्गत सुरक्षा, माजी सैनिकांचे कल्याण तसेच आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विविध महत्त्वपूर्ण व व्यापक विषयांवर सखोल चर्चा झाली.
लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, लष्करी-नागरी समन्वयाबाबत चर्चा

Devendra Fadnavis : लष्कराच्या दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या उच्चस्तरीय भेटीत उभयतांनी लष्करी-नागरी समन्वय व संवादाच्या अनुषंगाने चर्चा केली. याप्रसंगी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

राज्याच्या सुरक्षेची क्षमता बळकट करणे…

राज्याच्या सुरक्षेची क्षमता बळकट करणे, लोककल्याणाच्या उपक्रमांना गती देणे आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रभावी प्रतिसाद देणे या बाबींवर दोन्ही बाजूंनी एकत्रित प्रयत्नांची तयारी दर्शवली. या बैठकीत नागरी-लष्करी सहकार्य, अंतर्गत सुरक्षा, माजी सैनिकांचे कल्याण तसेच आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विविध महत्त्वपूर्ण व व्यापक विषयांवर सखोल चर्चा झाली. त्यामुळं या दोघांची भेट ही अतिशय महत्वाची मानली जाते.

आपत्ती व्यवस्थापन व व्यापक विषयांवर चर्चा

ही बैठक भारतीय लष्कराच्या नागरिकांप्रति असलेल्या अविरत सेवाभावाची साक्ष आहे. सर्व स्तरांवर सशक्त लष्करी-नागरी समन्वय साधणारी भेट असल्याचे बोलले जात आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी लष्कर आणि नागरी प्रशासन यांच्यातील सहकार्य अधिक सुसंगत व प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे. या भेटीत लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आपत्ती व्यवस्थापन आणि विविध महत्त्वपूर्ण आणि व्यापक विषयांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews