Marathi News

ग्लोबल मीडिया व राज्य शासनाच्या भागीदारीत नवे पर्व, नेटफ्लिक्स, मोशन पिक्चर आणि युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसोबत सरकारची चर्चा

Written by:Astha Sutar
Last Updated:
ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध कथा जगभर पोहचवण्यासाठी एकत्र काम करण्याच्या संधी विषयी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि सारंडोस यांनी चर्चा केली. सारंडोस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत व्हेवज (WAVES) परिषदेबद्दल सरकारचे अभिनंदन केले.
ग्लोबल मीडिया व राज्य शासनाच्या भागीदारीत नवे पर्व, नेटफ्लिक्स, मोशन पिक्चर आणि युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसोबत सरकारची चर्चा

CM Devendra Fadnavis – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली.

ग्लोबल मीडिया आणि राज्य शासन क्षेत्रातील भागीदारांमध्ये व्हेवज परिषदेच्य़ा माध्यमातून नवे पर्व सुरु आहे.  राज्य शासन आणि आंतरराष्ट्रीय माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख संस्थांमध्ये झालेल्या भेटीमध्ये राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर प्रसार, कौशल्य विकासासाठी नवे मार्ग खुले होण्याबाबत चर्चा झाली.

व्हेवज संमेलन मनोरंजन उद्योगासाठी महत्त्वाचे

दरम्यान, व्हेवज (WAVES) संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले. तसेच हे संमेलन मनोरंजन उद्योगासाठी महत्त्वाचे ठरल्याचे यावेळी सांगितले. युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  देवराज सान्याल, अभिनेता-दिग्दर्शक व एक्सेल एंटरटेनमेंट चे संस्थापक फरहान अख्तर व सहसंस्थापक आणि निर्माते रितेश सिधवानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

राज्यात जागतिक दर्जाचा स्टुडिओ व्हावा…

पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट ‘राजा हरिशचंद्र’ ची आठवण काढत भारताच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव केला. महाराष्ट्रमध्ये जागतिक दर्जाचे स्टुडिओ उभारण्यासाठी सहकार्याबद्दल उभय मान्यवरांमध्ये चर्चा झाली. जागतिक पातळीवरील चित्रपट, टेलिव्हिजन आणि स्ट्रिमिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. भारताला आगामी ५ वर्षांत मनोरंजन क्षेत्रात मोठी संधी आहे. महाराष्ट्रातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात कौशल्य विकासासाठी नेटफ्लिक्स आणि राज्य शासन यांच्यातील संभाव्य सहकार्याची चर्चाही यावेळी झाली.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews