तलाठ्यांनो, रोज येऊन कार्यालयात चेहरा दाखवा, अन्यथा पगार मिळणार नाही, फेसॲप नोंदणी बंधनकारक

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
मंत्रालयात फेस रिडींग सिस्टीम बसविण्यात आली आहे. यानंतर आता महसूल विभागातील तलाठी, कर्मचारी, अधिकारी यांना दररोज कार्यालयामध्ये फेस रेडिंगच्या माध्यमातून हजेरी लावणे बंधणकारक असणार आहे. अन्यथा तो दिवस गैरहजर दाखवला जाईल.
तलाठ्यांनो, रोज येऊन कार्यालयात चेहरा दाखवा, अन्यथा पगार मिळणार नाही, फेसॲप नोंदणी बंधनकारक

face app reading : राज्यातील महसूल विभागातील कार्यालयामध्ये फेस ॲप आणले जाणार आहे. आणि या फेस ॲपवर नोंदणी झाली तरच या कर्मचाऱ्यांना त्या दिवसाचा पगार मिळणार, अन्यथा फेस ॲपवर नोंदणी नसल्यास पगार मिळणार नाही, महसूल विभागातील तलाठी, कर्मचारी ते अधिकारी यांना दररोज कार्यालयामध्ये हजेरी लावणे बंधणकारक असणार आहे. असा शासन आदेश लवकरच जारी करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

नोंदणी न झाल्यास गैरहजर…

दरम्यान, तलाठी, कर्मचारी ते उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच फेस ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्या गावात, शहरात, जिल्ह्यात नोकरी करत आहे, त्या लोकेशनवर जात फेस ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. तर फेस ॲपवर नोंदणी न झाल्यास तो कर्मचारी, अधिकारी किंवा तलाठी गैरहजेर असल्याचे ग्राह्य धरण्यात येईल, असंही बावनकुळेंनी सांगितले. दुसरीकडे महसूल मंत्र्यांकडून रायगड जिल्ह्यातील महसूलच्या विभागातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर फेस रिडींग अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फेस रिडींग करावा लागणार…

फेस रिडींगची प्रणाली मंत्रालयात आल्यानंतर आता ही महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी आणि तलाठी यांच्यासाठी लागू करण्यात येणार आहे. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात जाऊन आपली फेस रिडींग नोंदणी करावी लागणार आहे. तरच त्यांची हजेरी लागेल. त्या दिवसाची उपस्थिती असल्याची नोंद होईल. नाहीतर नोंद होणार नाही. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी फेस ॲप व जिओ-फेन्सिंग प्रणाली बंधनकारक असल्याने कर्मचाऱ्यांची हजेरी आता कार्यालयातूनच नोंदवली जाणार आहे. असे आदेश देण्यात आले आहेत.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews