महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून खरंतर एक मोठी बातमी समोर येत आहे. कारण, राज्यातील सर्व 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडतेय. राज्यभरात ठिकठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कडेकोट बंदोबस्तात खरंतर ही मतमोजणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेला. त्यानुसार, ठिकठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
दुपारपर्यंत निकाल होणार स्पष्ट
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्त्वाचा निकाल दिलेला. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यानं राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला पार पडली.
त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे, 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिलेले. त्यानुसार आज मतमोजणी होत असून दुपारी निकाल स्पष्ट होतील.
निकालात कोण मारणार बाजी ?
राज्यात सर्वच राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांनी ताकद पणाला लावली होती. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरेल, अशी शक्यता दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडूनही तसा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची काय स्थिती राहणार ? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. महापालिका निवडणुकांच्या आधी हे निकाल येत असल्याने या निकालांना विशेष महत्व आहे.





