Fri, Dec 26, 2025

मोठी बातमी! भाजपाच्या तीन बड्या नेत्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी, काय घडलंय?

Written by:Rohit Shinde
Published:
कुडाळ न्यायालयाने आमदार नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना मोठा दणका दिला आहे. या तिन्ही नेत्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोठी बातमी! भाजपाच्या तीन बड्या नेत्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी, काय घडलंय?

कोरोना कालावधीतील एका आंदोलनप्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या तीन नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने दणका दिला. राज्याचे कैबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनाही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

कुडाळ कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

कुडाळ न्यायालयाने आमदार नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना मोठा दणका दिला आहे. या तिन्ही नेत्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, संविधान बचाव आंदोलन प्रकरणीही त्यांच्यावर वॉरंट जारी झाले आहे. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत नितेश राणे आणि त्यांच्यासोबतचे अन्य पाच जण गैरहजर राहिले. तर आमदार निलेश राणे आणि राजन तेली यांच्यासह अन्य आरोपी उपस्थित होते. नितेश राणे न्यायालयाच्या तारखांना वारंवार गैरहजर राहिल्याने, न्यायालयाने त्यांच्या वकिलांचा विनंती अर्ज फेटाळत थेट अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

भाजपाच्या नेत्यांना कोर्टाचा मोठा दणका

आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य 42 जणांवर आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी, न्यायालयात आज झालेल्या सुनावणीस आमदार निलेश राणे आणि राजन तेली तसेच अन्य आरोपी उपस्थित होते. मात्र, नितेश राणे यांच्यासह अन्य 5 जण गैरहजर होते. मंत्री नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्याने न्यायालायाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, न्यायालयाने अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज नाकारला आहे. त्यामुळे, मंत्री महोदयांना कोर्टाकडून दणका देण्यात आला आहे. त्यामुळे अटक होते की टळते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.