राज्यभरातील महापालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे. सर्वत्र राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत. महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतांची मोजणी होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेत कुणाची सत्ता येणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. या प्रश्नाचे काही अंशी उत्तर एक सर्व्हे नुकताच समोर आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत पालिकेत कुणाची सत्ता येणार ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशा परिस्थितीत अनेकांची झोप उडवणारा असा सर्व्हेचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
मुंबई महापालिकेत कुणाची सत्ता येईल ?
निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत कुणाची सत्ता येईल ? याबाबत एका सर्व्हेची आकडेवारी समोर आली आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि शिवसेना-भाजपच्या महायुतीपैकी कोणाची सरशी होणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेच्या निकालाबाबत अंदाज वर्तविणारा पहिला सर्व्हे समोर आला आहे. ‘व्होट वाईब इंडिया’चे संस्थापक असलेल्या अमिताभ तिवारी यांनी खरंतर याबाबत खुलासा केला आहे.
सर्व्हेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा ?
भाजप – 82
शिवसेना (शिंदे गट) – 32
NCP (अजित पवार) – 05
शिवसेना UBT-मनसे – 79
काँग्रेस – 19
NCP (शरद पवार) – 00
इतर – 10
ठाकरे बंधुंना चांगलं यश मिळण्याची शक्यता
BMC च्या डेमोग्राफिक प्रोफाईलनुसार मुंबईत 40% मराठी, 20% मुस्लिम आणि 40% इतर (गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय) समाज आहे. कागदावर सध्या भाजप आणि शिंदे शिवसेना युतीला 114 जागांचे बहुमत असल्याचे दिसत असले तरी ठाकरे बंधू एकत्र आल्याने तयार होणारी ‘भावनिक लाट’ आणि मराठी-मुस्लिम मतांचे एकत्रीकरण झाल्यास मुंबई महापालिकेत मोठा उलटफेर होऊ शकतो. ठाकरे बंधुंच्या युतीला मुंबईत चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिका निवडणुकांचे बिगुल काही दिवसांपूर्वी वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत मोठी घोषणा केली होती. त्यानुसार, 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 25 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 ला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.
महत्वाच्या तारखा
अर्ज स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवार माघारीची मुदत – २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवाराची यादी – ३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
मतमोजणी तारीख – १६ जानेवारी २०२६





