2008 मालेगाब बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाचा निकाल समोर; साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
2008 मध्ये मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉम्ब स्फोटाचा आज मुंबई विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. यामध्ये सबळ पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
2008 मालेगाब बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाचा निकाल समोर;  साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

2008 मध्ये मालेगाव बॉम्ब स्फोटाचा आज मुंबई विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. यामध्ये कोर्टाने या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांसह सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. मोटार सायकलमध्ये स्फोट झाल्याचेही सिद्ध झाले नाही, स्फोट झाल्याचे सिद्ध होत नाही, असे म्हणत कोर्टाने सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी अशी या सात आरोपींची नावे आहेत. त्यामुळे तपास यंत्रणेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

आजचा कोर्टाचा निकाल नेमका काय?

या संपूर्ण खटल्यादरम्यान 323 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. मात्र सुनावणीदरम्यान 40 साक्षीदार फितूर झाले तर 25 साक्षीदारांचा मृत्यू झाला. प्रसाद पुरोहितने आरडीएक्स आणल्याचा कोणताही पुरावा नाही. मोटार सायकलमध्ये स्फोट झाल्याचेही सिद्ध झाले नाही. या प्रकरणाचा पंचनामाही व्यवस्थित झाला नाही. साध्वी प्रज्ञासिंहच्या बाईकचा चेसी नंबरही नीट नव्हता, त्यामुळे ही गाडी प्रज्ञा सिंहची होती हे सिद्ध होत नाही.  बोटाचे ठसेही आढळले नाहीत. या आरोपींमध्ये बैठका झाल्याचा कोणताही पुरावा नाहीत त्यामुळे कट शिजला हे सिद्ध करायला आवश्यक पुरावे नाहीत असे कोर्टाने या निकालामध्ये म्हटले आहे.

मालेगावात त्यावेळी नेमकं काय घडले?

२००८ मालेगाव बॉम्बस्फोट ही भारताच्या इतिहासातील एक गंभीर आणि वादग्रस्त घटना होती. २९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात एक स्फोट झाला. या स्फोटात ६ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १०० लोक जखमी झाले. स्फोट एक मोटरसायकलमध्ये लपवलेल्या बॉम्बमुळे झाला होता.

सुरुवातीला यामागे इस्लामी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय होता, परंतु तपास पुढे गेला तसं हिंदू अतिरेक्यांचा सहभाग समोर आला. तपास यंत्रणांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित, आणि इतर काही लोकांना अटक केली. हे प्रकरण भारतात ‘हिंदू अतिरेकी गटां’च्या संकल्पनेवर प्रकाश टाकणारे ठरले. या प्रकरणाची चौकशी एटीएस (Anti-Terrorism Squad) आणि नंतर NIA (National Investigation Agency) यांनी केली.

या घटनेमुळे देशभरात राजकीय खळबळ उडाली आणि धार्मिक ध्रुवीकरण वाढले. अटक केलेल्या आरोपींवर अनेक वर्षे खटला चालू राहिला. काही आरोपींना जामीनही मिळाला. आजही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून समाजात या घटनेबाबत तीव्र भावना आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाने भारतात दहशतवादाच्या स्वरूपावर आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रभाव टाकला.

साध्वी प्रज्ञासिंह आरोपी होण्याचे कारण?

मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉमस्फोटात 6 निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता, 100 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र जो हादरून गेला होता. घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.