Dhananjay Munde – बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येशी वाल्मिक कराड यांचा संबंध असल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे धनंजय मुंडेंना साडेचार महिन्यापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु मंत्रीपद जाऊन साडेचार महिने झाले तरी धनंजय मुंडेंना शासकीय बंगला काही सोडवेना, असे चित्र दिसत आहे. मंत्रीपदावर नसताना मुंडेंना शासकीय बंगल्यात वास्तव केल्यामुळं त्यांना दंडही भरावा लागणार आहे.
42 लाख रुपये दंड…
दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद जाऊन साडेचार महिने झाले तरीसुद्धा ते सातपुडा या शासकीय बंगल्यातच राहत असल्याचं दिसून आलं आहे. या साडेचार महिन्यात मंत्री पदावर नसतानाही सातपुडा या शासकीय बंगल्यात राहत असल्यामुळे त्यांना 42 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. शासकीय पद किंवा मंत्रीपदावर नसल्यास तुम्ही कुठल्याही शासकीय वास्तूचा वापर करता येणार नाही, असं नियमात म्हटल आहे. तरीसुद्धा धनंजय मुंडे हे साडेचार महिने सातपुड्या बंगल्यात राहतात. त्यामुळे त्यांना दंडापोटी 42 लाख रुपये रक्कम भरावी लागणार आहे.
मंत्री भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेत…
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे. परंतु मंत्रिपद मिळूनही ते अजूनही शासकीय बंगल्यात राहायला गेले नाहीत. कारण धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद छगन भुजबळ यांना मिळाले आणि सातपुडा या शासकीय बंगल्यात मुंडे राहतात. त्यामुळे छगन भुजबळ अजूनही शासकीय बंगल्यात राहायला जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या परवानगी घेऊन सातपुडा या बंगलात आणखी काही दिवस धनंजय मुंडे हे राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण आता मंत्री छगन भुजबळ यांचा गृहप्रवेश कधी होणार आणि धनंजय मुंडे हा बंगला कधी सोडणार, याकडेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.





