Ajit Pawar – महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन अर्थमंत्री म्हणून अजित पवार होते. यावेळी अर्थमंत्री अजित पवार हे आपल्याला निधी डावलतात. निधी देण्यास हात आखडता घेताहेत, असा आरोप त्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यानी करत शिवसेनेतून बंड केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अजित पवार अर्थमंत्री झालेत. परंतु निधीवरून शिवसेनेचे मंत्री यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराज व्यक्त करत तक्रार केली होती.

शिवसेनेच्या मंत्र्यांची पवारांबाबत तक्रार…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अन्य विभागातील निधी वळवण्यात आला होता. तसेच मतदारसंघातील काम करण्यासाठी आणि लोकांची काम करण्यासाठी आवश्यक निधी लागतो. परंतु हा निधी अर्थमंत्री अजित पवार देत नाहीत. निधीत भेदभाव करतात… हात आखडतात घेतात, असा आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी करत अजित पवार यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मात्र यानंतर निधीच्या फाईलवर सही माझ्या एकट्याची नसते. तर मुख्यमंत्र्यांचीही असते असं स्पष्टीकरण अजित पवारने दिलं होतं.

खिशात पैसे घेऊन फिरतो का?

दुसरीकडे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिनाच्या  कार्यक्रमात बोलताना अजित पवार शिंदे गटातील नेत्यांचे नाव न घेता टिका केली. “काही लोकं म्हणतात की, अजित पवार निधी देत नाही… अजित पवार पैसे देत नाही… पण अरे निधी काय अजित पवार खिशात घेऊन फिरतो काय?” असा टोला अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना नाव न घेता लगावला आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या या प्रतिउत्तराला शिवसेनेचे मंत्री कसे उत्तर देतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.