MNS Celebration – पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्राला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबत दोन्ही जीआर रद्द केले आहेत. दरम्यान, त्रिभाषेचा दोन जीआर सरकारने रद्द केल्यानंतर यावर राजकीय व सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना, आता याचा आनंद म्हणून मनसैनिकांकडून मुंबईत ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे.
हा मराठी माणसांचा विजय…
दुसरीकडे या जीआर रद्दच्या घोषणेनंतर सर्वंत्र आनंद साजरा केला जात आहे. फटाके आणि ऐकमेकांस पेढे वाटले जाताहेत. तसेच फटाके फोडून आंनद साजरा केला जात आहे. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे. मराठी मन, आणि मराठी माणूस एक आल्यानंतर काय होते. हे सरकारले दिसले. अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
हे ही वाचा
तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही…
राजकीय व सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आता यावर शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, शिक्षक आणि पालकांच्याही प्रतिक्रिया येताहेत. जोपर्यंत शासन निर्णय येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणाच्याही तोंडी विधानावर विश्वास ठेवणार नाही. पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्र्यांनी सक्ती नसल्याचे सांगून नंतर तिसरी भाषा सक्ती केलीच. त्यामुळे तिसरी भाषा रद्द केल्याचा आधी जीआर काढा. नंतर आम्ही यावर विश्वास ठेवू, असं शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, शिक्षक आणि पालकांनी म्हटलं आहे.