Dry Day In Maharashtra : आजपासून 4 दिवस दारू विक्री बंद; तळीराम टेन्शनमध्ये

Published:
Last Updated:
आज पासून चार दिवस महापालिका क्षेत्रात दारू विक्रीसाठी बंदी असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज पासून 13, 14, 15 ,16 तारखेला दारूची दुकाने बंद राहतील.
Dry Day In Maharashtra : आजपासून 4 दिवस दारू विक्री बंद; तळीराम टेन्शनमध्ये

Dry Day In Maharashtra : महाराष्ट्रातील तळी रामासाठी चिंतेची बातमी आहे. आज पासून चार दिवस महापालिका क्षेत्रात दारू विक्रीसाठी बंदी असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज पासून 13, 14, 15 ,16 तारखेला दारूची दुकाने बंद राहतील.

बार सुद्धा बंद (Dry Day In Maharashtra)

या कालावधीमध्ये राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये दारूची सर्व दुकानं, बार आणि परमिट रूम बंद राहणार आहेत. तसंच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे दारू पिणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. दारूची दुकाने बंद असल्याने आता निवडणुकीच्या निकालानंतरच तळीरामांना दारू पिता येणार आहे. Dry Day In Maharashtra

या कालावधीला ‘ड्राय डे’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.  निवडणुकांच्या पारदर्शकतेसाठी आणि शांततेसाठी पार पडाव्या यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून ड्राय डे घोषीत करण्यात आला आहे.

आज प्रचाराच्या तोफा थंडावणार

दरम्यान, आज मंगळवार 13 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 15 जानेवारी रोजी मतदान होईल आणि 16 जानेवारीला सर्वच महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येईल. त्यामुळे आजपासून मंगळवार 13 जानेवारीपासून ते 16 जानेवारीला मतमोजणी पूर्ण होईपर्यंत चार दिवस दारूची दुकाने बार आणि परमिट रूम बंद राहणार आहेत.

ड्राय डे चे वेळापत्रक 

मंगळवार, 13 जानेवारी 2026, संध्याकाळी 6:00 वाजल्यापासून दारूच्या दुकानांवर बंदी लागू
बुधवार, 14 जानेवारी 2026 – संपूर्ण दिवस
गुरुवार, 15 जानेवारी 2026 – मतदानाचा पूर्ण दिवस
शुक्रवार, 16 जानेवारी 2026 – मतमोजणीपर्यंत दारूची दुकाने बंद राहतील

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews