एकनाथ शिंदेंनी घेतलं राज ठाकरेंच्या घरातील बाप्पाचे दर्शन, गणेशोत्सवानिमित्त कुटुंबीय एकत्र आले यांचा आनंदच…

Written by:Astha Sutar
Published:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. यानंतर एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतले.
एकनाथ शिंदेंनी घेतलं राज ठाकरेंच्या घरातील बाप्पाचे दर्शन, गणेशोत्सवानिमित्त कुटुंबीय एकत्र आले यांचा आनंदच…

Eknath Shinde : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी दिड दिवसांचा घरी विराजनाम झाला आहे. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. दरम्यान, बुधवारी (27 ऑगस्ट) मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे सहकुंटंब जात शिवसेना गणपतीचं दर्शन घेतलं. तब्बल 22 वर्षांनी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्तानं गेले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. यानंतर एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतले.

त्यांच्याकडे आज यावे लागत आहे

दरम्यान, आम्ही दरवर्षी राज यांच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येतो. मात्र यंदा इतरही काहीजण आले आणि यानिमित्ताने कुटुंब एकत्र आले. यांचा आनंद वाटत असल्याचे मत व्यक्त केले. खिजगणतीत नसलेल्यांची आणि संपलेला पक्ष अशी ज्यांची हेटाळणी केली. त्यांच्याकडे आज यावे लागत आहे हे चांगलेच आहे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. राज यांच्याशी झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर आमच्या चर्चा झाल्या मात्र सगळ्याच गोष्टी आजच सांगून टाकणं योग्य नाही. काही योग्य वेळी तुम्हाला कळतील असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. दर्शनानंतर माध्यमांशी शिंदे यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलेत होते.

बैठकीत अनेक विषयांवर चर्चा

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. मात्र सगळ्याच गोष्टी आजच सांगून टाकणं योग्य नाही. काही योग्य वेळी तुम्हाला कळतील. वेळेवर काही गोष्टी समजतील. असे एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पत्नी सौ. शर्मिला राज ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर हेदेखील उपस्थित होते.