Marathi News

एसटी कर्मचाऱ्यांंसाठी गूड न्यूज! कपात केलेला 44 टक्के पगार ‘या’ तारखेला मिळणार

Written by:Arundhati Gadale
Published:
आर्थिक संकटाबाबत स्पष्टीकरण देताना एसटी महामंडळाच्या वतीने सांगिण्यात आले की, कर्मचाऱ्याचे वेतन आणि एलआयसीसह इतर निधीसाठी तब्बल 466 रुपयांची गरज आहे.
एसटी कर्मचाऱ्यांंसाठी गूड न्यूज! कपात केलेला 44 टक्के पगार ‘या’ तारखेला मिळणार

Eknsth Shinde

मुंबई : एप्रिल महिन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के पगार मिळाला. त्यांचा 44 टक्के पगारात कपात केली जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कारभारावर टीका करण्यात येत आहे. सरकारकडून मिळणारे अनुदान जमा झाले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या पगार कपात करण्या आल्याचे सांगितले जात होते. मात्र, या विषयीचे वृत्त समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी कर्मचाऱ्यांना लवकरच प्रलंबित वेतन दिले जाईल, असे जाहीर केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांन राज्याचे वित्त सचिव ओमप्रकार गुप्ता यांच्याशी चर्चा करत येत्या मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांचे कपात केलेले वेतन दिले जाईल, असे सांगितले.  त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

एसटी महामंडळचे अध्यक्षपद हे प्रशासकीय अधिकाऱ्याकडे होते. मात्र, बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी केली आहे. त्यामुळे एसटी आर्थिक संकटातून बाहेर येईल, असे बोलले जात आहे.

निधीची प्रतीक्षा

आर्थिक संकटाबाबत स्पष्टीकरण देताना एसटी महामंडळाच्या वतीने सांगिण्यात आले की, कर्मचाऱ्याचे वेतन आणि एलआयसीसह इतर निधीसाठी तब्बल 466 रुपयांची गरज आहे. मात्र, सरकारमार्फेत 305 कोटी इतकाच निधी मिळतो आहे. सरकारकडून उरलेला निधी मिळताच कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन दिले जाईल.

तुटीमध्ये वाढ…

एसटी महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. सरकारकडून मिळणारा निधी पुरेसा नाही. तसेच सवलतीच्या दरातील योजनांमुळे आर्थिक ताण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. सवलतीच्या दरातील योजनांसाठी देखील सरकार अनुदान देत असते मात्र ते देखील वेळत मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की राज्य सरकारवर आरोप केला जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल. पण आम्ही ठामपणे सांगतो की हे सामान्यांचे सरकार आहे. ते लाडक्या बहिणींना कधीच नाराज करणार नाही. ही योजना सुरूच राहणार आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणीच्या हफ्ताची रक्कम देखील वाढवली जाईल.

Follow Us :GoogleNews