MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Farmer Sold Kidney : कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी; संपूर्ण राज्यात खळबळ

Published:
सावकारी कर्जामुळे चक्क एका शेतकऱ्यावर स्वतःचीच किडनी विकण्याची वेळ आल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरात घडली आहे.  कर्जाचा परतावा फेडण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली असा आरोप संबंधित शेतकऱ्यानेच केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
Farmer Sold Kidney : कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी; संपूर्ण राज्यात खळबळ

Farmer Sold Kidney : मागील काही वर्षापासून सावकारी कर्जामुळे शेतकऱ्याचं जगणं मुश्किल झाले आहे. कर्जाच्या संकटामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळतोय. संपूर्ण भारतात शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे ही या राज्याला लाज आणणारी गोष्ट आहे. त्यातच आता सावकारी कर्जामुळे चक्क एका शेतकऱ्यावर स्वतःचीच किडनी विकण्याची वेळ आल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरात घडली आहे.  कर्जाचा परतावा फेडण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली असा आरोप संबंधित शेतकऱ्यानेच केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय ? Farmer Sold Kidney

याबाबत अधिक माहिती अशी कि, चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर (ता.नागभीड) येथील शेतकरी शिवदास कुडे यांनी काही वर्षांपूर्वी दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासा एका सावकाराकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, दुर्दैवाने त्याची जनावरे मेली आणि तो सावकारचे कर्ज फेडू शकला नाही. तेव्हापासून या खाजगी सावकाराने वारंवार पैसे देण्याचा तगादा लावला. घेतलेलं कर्ज परत करणे शेतकऱ्याच्या आवाक्या बाहेर गेलं. दुसरीकडे कर्जाचा बोजा वाढत गेल्यामुळे व्याजाची रक्कम प्रचंड वाढली. कर्ज मुदतीत न फेडल्याने चक्रवाढ व्याजाने एक लाखाचे १ लाखाचे ७४ लाख रुपये झाले. Farmer Sold Kidney

सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला

सावकाराचं भलं मोठं कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने स्वत:ची शेती आणि मोटारसायकल विकली. तरीही कर्ज फिटले नाही. अशावेळी शेतकरी अडचणीत असताना त्या निर्दयी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकण्याचा सल्ला दिला आणि सावकाराच्या सल्लानुसार आधी कोलकाता आणि नंतर कंबोडियाला जाऊन ८ लाख रुपयांना किडनी विकल्याचा दावा शेतकऱ्याने केला. सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत पीडित शेतकऱ्याने सावकारावर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.