धानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांचं लक्ष पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 2000 कधी मिळणार याकडे लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून 18 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील अशा चर्चा होत्या. त्यामुळे ही प्रतीक्षा नेमकी संपणार कधी? असा सवाल आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्यासंदर्भात आणखी वाट पाहावी लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे.
२ हजार कधी येणार खात्यामध्ये?
किसान सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण साधारणपणे चार महिन्यांच्या कालावधीनंतर केलं जातं. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं. त्याला आता चार महिने पूर्ण झाले आहेत. आता शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
20 वा हप्ता मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. बँक खातं आधार लिंक असावं. बँक खात्याच्या माहितीची पडताळणी केलेली असावी. शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशिअरी स्टेटसची तपासणी करावी. याशिवाय ओटीपी आणि नोटिफिकेशनसाठी मोबाईल क्रमांक अपडेट करावा. योजनेचे पैसे खात्यामध्ये येण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार हे मात्र निश्चित आहे.
२०१९ पासून योजना अविरत सुरू
पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारनं फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आता खरिप हंगामाच्या निमित्तानं 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 19 हप्त्यांचे 2000 रुपयांप्रमाणं पैसे देण्यात आले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळते याकडे शेतकऱ्याचंं लक्ष लागलं आहे. पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात आले होते. योजनेतील सातत्य लक्षात घेता शेतकऱ्यांना आगामी २० वा हप्ता देखील वेळेत मिळेलच, अशी आशा व्यक्त केली जात आहे.






