भारतीय रेल्वे ही प्रवाशांसाठी वरदान, सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासासाठी रेल्वे ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षात रेल्वेचे वाढलेले अपघात, आगीच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. आज सकाळी नांदेड- मेडचल (तेलंगणा) रेल्वे गाडीतही आगीची धक्कादायक घटना घडली.
नांदेड – मेडचल रेल्वेत भीषण आग
सोमवारी सकाळी नांदेड ते मेडचल रेल्वे गाडीला आग लागली आहे. शौचालय जवळ असलेल्या कचऱ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वेळीच आग लागल्याचं लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग विझवल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली आहे. यामध्ये प्रवाशांच्या जीवाला कोणताही धोका झाला नसल्याची माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा
1Konkan Railway : आंगणेवाडी जत्रेसाठी ‘स्पेशल ट्रेन’ची घोषणा; मुंबई–कोकण प्रवाशांचा प्रवास होणार सोप्पा
2Konkan Railway : कोकण रेल्वेचा कायापालट होणार!! 515 कोटींची तरतूद
3फेब्रुवारीत 5 दिवस दारू मिळणार नाही; ड्राय डे मुळे तळीरामांची पंचाईत
4सगळ्यांना सोबत नेऊ, अजित पवारांच्या अखेरच्या कॉलमध्ये काय? बारामतीत आज काय घडलं?