महाराष्ट्रात मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार, उपलब्ध जागा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार नागपूर, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांत वरिष्ठ पदांसाठी सुरू असेलल्या या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
महाराष्ट्रात मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार, उपलब्ध जागा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या!

तांत्रिक, प्रशासकीय, अभियांत्रिकी, देखभाल, सुरक्षा आणि ग्राहक सेवा अशा विविध पदांसाठी महाराष्ट्र मेट्रो वेळोवेळी भरती जाहिराती काढत असते. सरकारी नोकरीच्या स्वरूपात स्थिरता, चांगले वेतनमान, तसेच प्रगतीची संधी असल्यामुळे ही नोकरी तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते. मेट्रो प्रकल्पांमुळे केवळ शहरातील वाहतुकीत बदल घडत नाही, तर रोजगार निर्मितीतही मोठा हातभार लागतो. अशीच काहीशी मोठी भरती ही महामेट्रोमध्ये होणार आहे.

महामेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार नागपूर, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांत वरिष्ठ पदांसाठी सुरू असेलल्या या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2025 आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती पाच वर्षांच्या करारावर किंवा प्रतिनियुक्तीवर होणार आहे. वरिष्ठ आणि तांत्रिक पदांवर भरती जाहीर केली आहे. ही भरती अनुभवी व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी आहे. या भरती निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40,000 ते 2,80,000 रुपये पगारासह स्थिर करिअरची संधी मिळणार आहे.

भरतीतील पदे आणि शैक्षणिक पात्रता

चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (सिग्नलिंग),  डेप्युटी जनरल मॅनेजर (लँड मॉनिटायझेशन, सेफ्टी आणि ट्रेनिंग),  सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल, टेलिकॉम्युनिकेशन, AFC, पॉवर सप्लाय, OHE/TRD, IT) या पदांसाठी प्रामुख्याने भरती होणार आहे. पदांनुसार पगाराची श्रेणी 40,000 ते 2,80,000 रुपये आहे. चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (सिग्नलिंग) पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकॉम्युनिकेशन शाखेतील बी.इ. किंवा बी.टेक. पदवीसह किमान 19 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, तर डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी संबंधित क्षेत्रात 7 वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे. याशिवाय सेक्शन इंजिनिअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तांत्रिक क्षेत्रात 3 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी काय?

जनरल मॅनेजर (HR), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, नियर दीक्षाभूमी, नागपूर-440010 ‘या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.

उमेदवारांना अर्ज स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे. अर्जात जाहिरात क्रमांक आणि पदाचे नाव स्पष्टपणे नमूद करावे. सर्व आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचे दस्तऐवज) जोडावेत. अर्ज शुल्क भरावे (SC, ST आणि महिलांसाठी 100 रुपये. UR आणि OBC साठी 400 रुपये) अर्ज 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

वैयक्तिक मुलाखत, कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशी निवड प्रक्रिया असणार आहे. यशस्वी उमेदवारांना ईमेलद्वारे माहिती दिली जाईल, आणि पुढील सूचना महा-मेट्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahametro.org) (www.mahametro.org) प्रसिद्ध केल्या जातील. 10 ऑक्टोबर 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज करा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही देखील अशा नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews