समाज माध्यमावर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट करणाऱ्यांना चाप बसणार, शासनाकडून ‘गरुड दृष्टी’ हे तंत्र विकसित

Written by:Astha Sutar
Published:
कायदा व सुव्यवस्था नियंत्रण: सोशल मीडियामधून उद्भवणाऱ्या अफवा, द्वेषपूर्ण मजकूर, वादग्रस्त पोस्ट्स यामुळे होणारे तणाव व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न टाळण्यासाठी या साधनाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.
समाज माध्यमावर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट करणाऱ्यांना चाप बसणार, शासनाकडून ‘गरुड दृष्टी’ हे तंत्र विकसित

State Government : आजकाल जातीय तेढ निर्माण करणारे सोशल मीडियावर पोस्ट केली जाते. आणि यावरुन समाजात दंगल होते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने समाज माध्यमावर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट करणाऱ्यांना चाप बसणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून ‘गरुड दृष्टी’ हे तंत्र विकसित करण्यात येणार आहे. नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे ‘गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल 10 कोटी रुपये रकमेच्या वितरण समारंभात ते बोलत होते.

गुन्हेगारांवर आळा बसणार…

दरम्यान, काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी ‘गरुड दृष्टी’ हे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सोशल मीडिया माध्यमाद्वारे फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी ‘गरुड दृष्टी’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी हालचाली शोधून काढणे व त्यांचा मागोवा घेणे शक्य होईल.

मदतीसाठी 1930 व 1945 हे नंबर…

दुसरीकडे काहीजण समाज विघातक प्रवृत्ती द्वेष पसरवणे, धमक्या देणे, हेट स्पीच, फेक न्यूज, अंमली पदार्थांची तस्करीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपण पाहतो. यातील आर्थिक फसवणुकीचे प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशी ऑपरेटर चालवतात. त्यामुळे सर्वांनी सावध असले पाहिजे. आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या ऑफर्स आर्थिक फसवणुकीसाठी टाकलेले जाळे आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. जर आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर 1930 व 1945 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.