गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत सरकार अहवालाच्या शिफारसीनुसार धोरण आणणार, सरकार सोमवारी कोर्टात  आपली बाजू मांडणार

Written by:Astha Sutar
Last Updated:
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य शासनाने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागविला होता. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी हा अहवाल दिला आहे. त्यात अनेक महत्वाच्या शिफारसी करण्यात आल्यात
गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत सरकार अहवालाच्या शिफारसीनुसार धोरण आणणार, सरकार सोमवारी कोर्टात  आपली बाजू मांडणार

Ganesh Festival – गणेश मंडळासाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी समोर येत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक व दीर्घकालीन उपाययोजनांसह धोरण आणावे, जे न्यायालयात टिकेल असे धोरण आता राज्य सरकार आणणार आहे, याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधितांना दिले आहे.

कोर्टात सरकार बाजू मांडणार

दरम्यान, दुसरीकडे मोठ्या मूर्तीच्या विसर्जनाबाबत सरकार सोमवारी कोर्टात आपली बाजून मांडणार आहे. त्यामुळं आता यावर्षी गणेशमूर्ती विसर्जनाबाबत राज्य सरकारकडून नवे धोरण येणार आहे. छोट्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात यावे. शाडूच्या आणी पर्यावरण पूरक सामग्रीचा वापर करून मूर्ती बनविण्याबाबत जनजागृती आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव प्रथा परंपरेनुसार साजरा व्हावा आणि उंच, मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक मार्ग काढण्यात यावा, असे यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले.

विसर्जनाबाबत अहवालातील शिफारसी काय आहेत?

– जल प्रदुषणाचा विचार करून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करव्यात
– रासायनिक रंगांमुळे जास्त प्रदुषण होते. त्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर करावा
– पर्यावरणपूरक साहित्य वापरणे यावर भर देऊन जनजागृती व्हावी
– खोल समुद्रात मोठ्या मूर्तींचे विसर्जनबाबत अभ्यास करणे आवश्यक
– विसर्जनाबाबत अभ्यास करून न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यात यावी
– सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय आवश्यक
– गणेश मूर्तीं तयार करताना पर्यावरणस्नेही सामुग्रीचा वापर आणि नैसर्गिक रंगाचा वापर व्हावा, अशा शिफारसी अहवलात नमूद कऱण्यात आल्यात

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews