छगन भुजबळांवर हृदयाची शस्त्रक्रिया; भुजबळांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती!

Written by:Rohit Shinde
Published:
छगन भुजबळ यांची प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
छगन भुजबळांवर हृदयाची शस्त्रक्रिया; भुजबळांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती!

महाराष्ट्राच्या राजकारणातील फायरब्रँड नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आजारपणाचा सामना करत होते. यानंतर त्यांच्यावर आता हृदय शस्त्रक्रिया पार पडल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. तसेच मंत्रालयात पार पडलेल्या सर्व बैठकांमध्ये छगन भुजबळ उपस्थित होते. मात्र, त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

छगन भुजबळांवर हृदयाची शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची 28 ऑक्टोबर रोजी अचानक प्रकृती खालावली होती. त्याामुळे त्यांना तातडीने मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भुजबळा यांच्या छातीत दुखत होतं आणि अस्वस्थता या तक्रारींमुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

आज सोमवारी छगन भुजबळ यांच्यावर एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई इथं हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. विख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

डॉक्टरांचा भुजबळांना विश्रांतीचा सल्ला

विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रिये नंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला छगन भुजबळ यांना दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यात पुन्हा सक्रिय होणार आहेत, अशी माहिती भुजबळ यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.