Marathi News

महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; 7 दिवस तुफान पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये पुढील 7 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; 7 दिवस तुफान पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

उद्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि कोकणात या आठवड्यात पाऊस विश्रांती घेणार आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा चांगला जोर राहण्याची शक्यता आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांना या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील सात दिवस पाऊस जोरदार हजेरी लावण्याची शक्यात आहे. या काळात नागरिकांनी आवश्यक ती सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार!

हवामान विभागाकडून महाराष्ट्राला 17 सप्टेंबरपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये पुढील सात दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून महाराष्ट्राला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आगामी काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार अशा पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे तेलंगणा, कर्नाटक सीमाभागातील जिल्ह्यांमध्ये या काळात जोरदार अशा स्वरूपाचा कोसळेल, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली,कोल्हापूर या जिल्ह्यांत देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही भागात चांगल्या पावसाची गरज

दुसरीकडे मुंबई आणि कोकणपट्ट्यात पुढील काही दिवस पाऊस उसंत घेईल.मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर काही ठिकाणी सकाळच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरलेली होती. पुढील काही दिवसात राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे सततच्या पावसाला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल. तरी देखील मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात अद्याप अधिकच्या पावसाची प्रतीक्षा नागरिकांना आहे.

देशभरात पावसाची नेमकी काय स्थिती?

यंदाच्या हंगामामध्ये देशभरात पावसाचं प्रमाण चांगलं राहिलं आहे. अनेक राज्यांमध्ये तर पूर परिस्थितीचा सामना करावा लागला, याचा सर्वात मोठा फटका हा पंजाबला बसला आहे, पुरामध्ये पंजाबचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवस 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरदरम्यान अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता  आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews