Marathi News

आज महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

Written by:Rohit Shinde
Published:
काही दिवसांपूर्वी राज्यात जोरदार पाऊस झाला,  त्यानंतर दोन दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
आज महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला होता, राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला होता, राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला, शेतात पाणी साचल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहायाला मिळालं. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली आहे, मात्र अजूनही पावसाचा धोका टळलेला नाहीये. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांत हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसेल, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पुन्हा एकदा पावसाची सरशी होताना दिसत आहे. रायगड, पुणे, पुण्याचा घाटमाथा, सातारा आणि कोल्हापूर या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  हवामान विभागाने मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी तीव्र पावसाचा इशारा वर्तवला आहे. तर मग जाणून घेऊया, 24 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कशाप्रकारे राहणार आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर इतर पाच जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील. वातावरण ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यासाठी हवामान विभागाने 24 ऑगस्ट रोजी कोणताही अलर्ट जारी केलेला नाही.
मुंबई शहर तसेच उपनगरात आभाळ ढगाळ राहण्याची शक्यता असून अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मुंबईचे कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.

पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार!

पुढील पाच दिवस हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील 24 तासांमध्ये रायगड, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात जोरदार पाऊस झाला,  त्यानंतर दोन दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews