पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसानंतर काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली. मात्र, आता परत एकदा पावसाचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती.आता पुढचे तीन दिवस कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. फक्त महाराष्ट्राच नाही तर देशभरात पावसाने धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळाले . पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशभरात पाऊस कोसळतो आहे. महाराष्ट्रसह देशात असेही काही जिल्हे आहेत, ज्याठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
राज्यासह देशभरात पावसाचा जोर वाढणार!
हवामान तज्ज्ञांनी गणेशोत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या जिल्हांना मुळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मात्र, आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्य स्वरूपाच्या पावसाचा अंदात वर्तवण्यात आलाय. उद्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. उद्या आणि परवा राज्यासह देशात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
हे ही वाचा
बाकी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सततच्या पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झालंय. शेतकरी राजा चिंतेत आहे. राज्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. देशात पावसाचे संकट आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय. जायकवाडी धरणातून दोन महिन्यात 25 टीएमसी विसर्ग, आतापर्यंत 3 वेळा पाणी सोडण्यात आले. धरण क्षेत्रात पाण्याची सातत्याने आवक असल्याने सद्यस्थितीला धरणाचा साठा 99% वर गेला.
बहुतांश भागात पाण्याची चिंता मिटली!
पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि औद्योगिक वसाहतींची चिंता मिटली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या पैठण येथील जायकवाडी धरणातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळा संपण्यापूर्वीच शंभर टीएमसी क्षमता असलेल्या धरणातून तब्बल 25 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यावर्षी पावसाळ्यात तीन वेळा जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नांदेडमध्ये दोन वेळा गोदावरी नदीला पूर देखील आला होता.
राज्याच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस असला तरी यामध्ये काही दुष्काळी तालुके अथवा पट्ट्यांमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या भागातील शेतकरी अद्यापही मुसळधार अशा स्वरूपाच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत चांगला पाऊस होण्याची आशा आहे.