मान्सून राज्यात यंदा लवकर दाखल झाला. सुरूवातीला पावसाचा जोर चांगलाच बघायला मिळाला. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर ओसरल्याचे बघायला मिळते आगे. जुलैच्या शेवटी पाऊस कमी होताना दिसला. काही भागांमध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. ऑगस्टमध्ये देखील राज्यातील पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हवामान विभागाचा पावसाबाबतचा अंदाज नेमका काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊ…
विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज
ऑगस्टला सुरूवात झाली असून या महिन्यात पाऊस कसा राहणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. आज भारतीय हवामान खात्याकडून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येलो अलर्ट जाहीर करण्यात आला. कोकणाच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस सरासरी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला पाऊस चांगला झाला. त्यामुळे काहीशी चिंता वाढवणार असा हा हवामान विभागाचा अंदाज या निमित्ताने समोर येत आहे. मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. त्यात पावसाने मध्येच ब्रेक दिल्याने चिंता आणखी वाढणार आहे.
सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरी भरून काढणार!
ऑगस्ट महिन्यापेक्षा सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पंढरपूर उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. उजनी धरणातून 71000 तर वीर धरणातून 31000 क्यूसेक इतके पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. आज अमरावती, भंडारा, गोदिंया, नागपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली याठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एकंदरीत पाऊस राज्यातील सप्टेंबरमध्ये भरून काढण्याची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची कोणतीही शक्यता वर्तवलेली नाही. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर ओसरलेला स्पष्टपणे जाणवत आहे; मात्र विदर्भात काही भागांत अजूनही पावसाचा अंदाज कायम आहे. हवामानातील बदलांमुळे वातावरणात उष्णता आणि दमटपणा वाढला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.






