हवामान विभागाने राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि कोकणात देखील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा राज्यातील पावसाबाबतचा अंदाज सविस्तर समजून घेऊ…
विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार!
हवामान विभागाने आज राज्यातील काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदार वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिवसह आज संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. खरेतर या भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही दिलासादायक बातमी आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाने जर अशीच ओढ लावली तर या भागातील शेतातील पीके करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
मुंबईसह कोकणात पावसाचा जोर ओसरणार?
मुंबईसह कोकणात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या भागांमध्ये तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत जोरदार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावासाच अंदाज वर्तवणण्यात आला आहे.
ढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 26°C च्या आसपास असेल. मराठवाड्यातील काही भागांत व आसपास पाऊस कमी ते मोठ्या प्रमाणात कमी आहे. त्यामुळे शेतीवर ताण आहे. चांगल्या पावसाची गरज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नागरिकांना देखील सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.






