महाराष्ट्रावरील अतिवृष्टीचे संकट काही केल्या दूर होताना दिसत नाही. मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर मुसळधार पावसाचे संकट कायम आहे. महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, राज्यात पावासाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, दरम्यान आता या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून 17 जिल्ह्यांसाठी आपात्कालीन नंबर जारी करण्यात आले आहेत.
राज्यातील 7 जिल्ह्यांना इशारा
पुढील 24 तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आयएमडीकडून राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट तर उर्वरीत सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील 24 तास राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे, आज हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, जालना, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत सर्व जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे.
पंजाबराव डख म्हणतात…
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या मते, “राज्यातील सुरू असणार पावसाचा जोर 2 ऑक्टोबरपर्यंत कायम राहिल, तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे, मुंबई या भागावरील पावसाचे संकट कायम राहणार आहे. 2 ऑक्टोबरनंतर राज्यातील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.”
आपात्कालीन नंबर यादी
01. बीड – 02442-299299
02. लातूर – 02382-220204
03. धाराशिव – 02472-227301
04. नांदेड – 02462-235077
05. परभणी – 02452-226400
06. सोलापूर – 0217-2731012
07. पुणे – 09370960061
08. सातारा – 02162-232349
09. अहिल्यानगर – 0241-2323844
10. गडचिरोली – 07132-222031
11. कोल्हापूर – 02312-659232
12. रायगड – 08275152363
13. रत्नागिरी – 0705722233
14. सिंधुदुर्ग – 02362-228847
15. पालघर – 02525-297474
16. ठाणे – 09372338827
17. मुंबई शहर व उपनगर – 1916/022-69403344
यासोबतच मंत्रालयातील 24/7 कार्यकेंद्र क्रमांक 01. 022-22027990 02. 022-22794229 03. 022-22023039 04. 09321587143 आपात्कालीन परिस्थितीत वरील क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे. नागरिकांनी या काळात आवश्यक ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आपती व्यवस्थापन यंत्रणा देखील सतर्क आहे.





