राज्यात पुढील 4 दिवसांसाठी मेघर्जनसह मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट कुठे?

Written by:Astha Sutar
Last Updated:
सध्या पश्चिमेकडून येणार थंडगार वारे महाराष्ट्राच्या अरबी समुद्रात संकलन होत आहे. बाष्पीभवन तयार होऊन ढग निर्माण होतात आणि मग पावसाची स्थिती निर्माण होते. पावासासाठी वातावरण पोषक होते, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागातील हवामान तज्ञ शुभांगी भुते यांनी दिली आहे.
राज्यात पुढील 4 दिवसांसाठी मेघर्जनसह मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट कुठे?

mumbai – पावसाबाबत एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. मागील आठवड्यात राज्यातील काही भागात सुसाट्याचा, वादळी वारा आणि गारपीठसह पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली होती. अवकाळी पावसामुळं उकाड्याने हैराण झालेल्यांना गारव्याचा दिलासा मिळाला होता. यावेळी या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांसह, मुंबई आणि उपनगरात मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पुढील 4 दिवसांसाठी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे

‘ऑरेंज अलर्ट’ कुठे?

दुसरीकडे मुंबईसह कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गध्ये आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सोलापूर, कोल्हापूर, बीड आदी ठिकाणीही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेंच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. राज्यातील काही जिल्ह्यासह मुंबई, ठाणे आणि उपनगरातही पुढील ४ दिवसांसाठी म्हणजेच हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला आहे.

नागरिकांनी सतर्क राहावे…

पुढील ४ दिवस म्हणजे २१ मे ते २४ मे पर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ हवामाने विभागाने जारी केला आहे.

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळं राज्यातील विविध भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात केळी, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरीचं मोठे नुकसान झाले आहे. तर नाशिकमध्ये द्राक्षे, कांद्याचे, कोकणाच आंब्याचे मोठे नुकसान झालेय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुले लोकांनी सतर्क राहावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews