राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय कायम ठेवल्यानंतर पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. शाळेतल्या हिंदी भाषा सक्तीवर आता अभिनेता हेमंत ढोमे यानं भाष्य केलंय. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरून पुन्हा वादाची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे आणि शासन निर्णयावर (GR) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे हेमंत ढोमे यांचं ट्विट ?
हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी!
कृपया हा जीआर नीट वाचा…
हिंदी ही तृतीय भाषा असेल….
ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?)
एक देश, एक भाषा! असं करायचं ठरवलंच आहे तर…
पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध! आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय?
हिंदी सक्तीचा निर्णय?
हिंदी भाषेच्या सक्तीवरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. नवीन त्रिभाषा धोरणामुळे किंवा इतर कारणांमुळे, हिंदी भाषेला अधिक महत्त्व देण्याचा कोणताही निर्णय वादग्रस्त ठरू शकतो, विशेषत: अशा राज्यांमध्ये जिथे हिंदी भाषेचा प्रभाव कमी आहे किंवा जिथे स्थानिक भाषांना प्राधान्य दिले जाते. हिंदी भाषेच्या सक्तीवरून वाद होण्याची शक्यता अजूनही कायम आहे. कोणताही निर्णय घेताना, भाषिक विविधता आणि सांस्कृतिक अस्मितेचा आदर करणे आवश्यक आहे.






