भारतातील रिअल इस्टेटचे दर गगनाला भिडलेत अथवा दराचा फुगवटा केला गेला आहे, असे आरोप सातत्याने होताना दिसतात. त्यामध्ये आता मुंबई, पुण्यामध्ये आपले हक्काचे घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आता समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतींमुळे रिअल इस्टेट बाजारात आता मंदीचे वारे वाहत आहेत. यामुळे मालमत्ता विक्रीत लक्षणीय घट झाली असून याचा सर्वाधिक परिणाम मुंबई आणि पुणे यांसारख्या प्रमुख महानगरांमध्ये दिसून येत आहे. परिणामी घटत्या मागणीमुळे भविष्यात घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात बड्या शहरांतील तुमचे घर खरेदीचे स्वप्न साकार करण्याची उत्तम संधी निर्माण होऊ शकते.
मागणी घटल्याने घरांच्या किंमती कमी होण्याचा अंदाज
बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे मागणी कमी झाली आहे. मार्केटमध्ये मागणी कमी झाली आणि पुरवठा जास्त असला तेव्हा वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता असते. ही मंदी अशीच कायम राहिली आणि नवीन घरांची संख्या कमी झाली तर बांधकाम कंपन्यांना विक्री न झालेल्या घरांचा साठा कमी करण्यासाठी किमती कमी करू शकतात. एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील आठ प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये घरांच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत 14 टक्य्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 113,768 युनिट्सची विक्री झाली होती, ती यंदा 97,674 युनिट्सवर आली आहे. या विक्रीतील घसरणीचा सर्वाधिक फटका मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे या शहरांना बसला आहे.
एप्रिल-जून 2025 मध्ये मुंबई आणि पुण्यातील घरांची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 30 टक्क्यांनी घसरून 41,901 युनिट्सवर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या दोन्ही शहरांमध्ये एकत्रितपणे 60,191 युनिट्सची विक्री झाली होती. यावरून हे लक्षात येते की वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक घरांच्या खरेदीपासून दूर जात आहेत. दिल्ली-एनसीआरमध्येही घरांच्या विक्रीत 9 टक्के घट झाली आहे, तर हैदराबादमध्ये 6 टक्के घसरण नोंदवली गेली आहे.
किंमती कमी झाल्यास हक्काचे घर खरेदीची सुवर्णसंधी
बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे मागणी कमी झाली आहे. मार्केटमध्ये मागणी कमी झाली आणि पुरवठा जास्त असला तेव्हा वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता असते. ही मंदी अशीच कायम राहिली आणि नवीन घरांची संख्या कमी झाली तर बांधकाम कंपन्यांना विक्री न झालेल्या घरांचा साठा कमी करण्यासाठी किमती कमी करू शकतात. यामुळे भविष्यात विशेषतः मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती स्थिर राहण्याची किंवा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काही काळात बाजारातील एकूण स्थिती बदलली तर घराच्या किंमती कमी होऊ शकतात.






