राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे. यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच आज आपण इथं महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये महापौराची निवड कशी केली जाते? हे जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र नगर पालिका कायद्यानुसार, महानगरपालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये एकाच सभेत महापौर निवडला जातो. नागरिक प्रथम नगरसेवकांसाठी मतदान करतात, आणि नंतर हे नगरसेवक आपल्या संघटनेतील बाजूने महापौर निवडण्याचा मतदानाचा निर्णय घेतात. दरम्यान, महाराष्ट्रातील काही जण व आयोगांनी थेट जनतेतून महापौर निवडण्याच्या प्रस्तावांची शिफारस केली आहे.
महाराष्ट्रात महापौर कसा निवडला जातो?
महानगरपालिका निवडणूक– नागरिक मतदान करून नगरसेवक निवडतात.
पहिली सर्वसाधारण सभा-निवडणुकीनंतर महानगरपालिकेची पहिली विशेष सभा बोलावली जाते.
महापौरपदासाठी उमेदवारी– निवडून आलेल्या नगरसेवकांपैकीच महापौरपदासाठी उमेदवार उभे राहतात. राजकीय पक्ष किंवा आघाडी आपला उमेदवार सुचवतात.
नगरसेवकांचे मतदान– सर्व नगरसेवक मतदान करतात. ज्याला बहुमत मिळते, तो महापौर म्हणून निवडला जातो.
कार्यकाळ– महाराष्ट्रात महापौरांचा कार्यकाळ साधारणपणे २.५ वर्षांचा (अडीच वर्षे) असतो. ५ वर्षांच्या कालावधीत साधारणपणे दोन महापौर होतात.
महापौराची कामं
महापौर हा शहराचा प्रथम नागरिक मानला जातो. महापौरांचे अधिकार प्रामुख्याने सभा चालवणे, प्रतिनिधित्व करणे व समन्वय साधणे इतके असतात. महानगरपालिका आयुक्तांकडे प्रत्यक्ष प्रशासकीय अधिकार असतात.
महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान
राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी पुढील महिन्यात म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महानगरपालिका आहेत, त्यांचीही निवडणूक होणार आहे.





