सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्या, वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल आस्था असणारा असावा, पण मंत्री हे जुगार खेळताहेत, त्यामुळे त्यांना तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी चित बहुजन आघाडीने केली आहे. कृषिमंत्र्यांनी केलेली जुगार क्रांती ही महाराष्ट्राने पहिली आहे.
सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्या, वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी

Vanchit Bahujan Aghadi – राज्याला दुर्दैवाने महाराष्ट्राला जो कृषिमंत्री मिळालाय त्याची शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे, हे याच्या आधी केलेल्या बेताल विधानावरून लक्षात येतच. शेतीचं ज्ञान त्यांचं त्यांना माहिती आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती किती आहे हे त्यांनी सभागृहात बसून जंगली रमी सारखा जुगार खेळून सिद्ध केलं आहे.

जुगार खेळण्यासाठी कोकाटेंना सरकारने मोकळीक द्यावी

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे ही ठाम आग्रही आणि महत्त्वाची मागणी आहे की माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे, त्याऐवजी सभागृहात बसून जर का ऑनलाइन जुगार खेळत असतील तर तो खेळण्यासाठी त्यांना मोकळीक शासनाने द्यावी, त्यांना मंत्रिपदाच्या कामात अडकवून ठेवू नये. जास्तीत जास्त वेळ त्यांना रमी खेळता येईल. यासाठी तातडीने त्यांच्याकडनं राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी आहे.

कृषिमंत्र्यांची जुगार क्रांती सर्वांनी पाहिली…

दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी ज्याला शेती संदर्भात खऱ्या अर्थाने जाण असेल आणि त्यांची शेतकऱ्यांच्या संदर्भात बांधिलकी असेल अशा व्यक्तीलाच ते खातं देण्यात यावं. या देशाने आजपर्यंत दुधाच्या क्षेत्रातील श्वेतक्रांती पाहिली, पिकांच्या संदर्भातली हरित क्रांती पहिली. आणि आता महाराष्ट्राच्या विधानभवनात बसून ऑनलाईन जुगार खेळून या कृषिमंत्र्यांनी केलेली जुगार क्रांती ही पहिली. शेती, शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नाशी जराही बांधील की नसणाऱ्या या कृषिमंत्र्याचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा.