कोकणातील मान्सूनच्या पावसाचा प्रभाव कमी होणार; राज्यात पावासाची काय स्थिती?

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यातील बहुतांश ठिकाणी सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून, संपूर्ण दिवसभर हलक्या ते मध्यम सरींचा मारा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
कोकणातील मान्सूनच्या पावसाचा प्रभाव कमी होणार; राज्यात पावासाची काय स्थिती?

राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत. तरी मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. कोकण किनारपट्टीवर, विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारचे हवामान पाहायला मिळत आहे. सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून, संपूर्ण दिवसभर हलक्या ते मध्यम सरींचा मारा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीजवळ वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात उतरणे टाळावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मुंबई-ठाण्यात पावसाची काय स्थिती?

मुंबई शहर आणि परिसरात आज सकाळपासून आकाशात ढगांची उपस्थिती असून, काही भागांमध्ये रिमझिम पावसाच्या सरी पडत आहेत. अंधेरी, कुर्ला, दादर आणि मालाड परिसरात सकाळी सौम्य पाऊस झाला. दुपारी काही वेळ पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज आहे. याकाळात दमट हवामानामुळे नागरिकांना उष्मा आणि घामाचा त्रास जाणवू शकतो.
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज दिवसभर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाण्यात डोंबिवली, कल्याण आणि भिवंडी भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईतील वाशी, नेरूळ आणि बेलापूर परिसरात सकाळी आकाश ढगांनी भरलेले होते आणि काही काळ मध्यम पावसाचा अनुभव आला. या भागांसाठी वीजांचा गडगडाट किंवा वादळी इशारा नसला, तरी सायंकाळच्या वेळेस काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात.

किनारपट्टीवर पावसाचा जोर ओसरणार?

पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून वातावरण उष्ण आणि अंशतः ढगाळ आहे. वसई, बोईसर, डहाणू तसेच जव्हार भागांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, या भागांमध्ये संपूर्ण दिवसभर हलक्या पावसाची शक्यता असून, दुपारनंतर काही ठिकाणी मध्यम सरी पडू शकतात. कोकण किनारपट्टीवर, विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारचे हवामान पाहायला मिळत आहे. सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून, संपूर्ण दिवसभर हलक्या ते मध्यम सरींचा मारा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीजवळ वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात उतरणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्यात पावसाची स्थिती कशी राहणार?

सद्यस्थितीला एकूणच राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. कोकण, मुंबई परिसरात पावसाच्या सरी सुरू आहेत. मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात तुरळक स्वरूपाचा कमी – अधिक पाऊस पाहायला मिळत आहे. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कारण पीकांची वाढ होण्यासाठी सद्यस्थितीला पावसाची गरज आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews