Marathi News

मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय काय?

Written by:Astha Sutar
Published:
4 व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्षे मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रा सारखाच दर्जा देण्याचा निर्णय. मच्छिमारी, मत्स्य व्यावसायसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, सवलतीचा लाभ होणार आहे.
मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय काय?

मुंबई – आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री तसेत अन्य मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण ८ महत्त्वाचे निर्णय झाले. विशेष म्हणजे राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला या निर्णय कामगार विभागा अंतर्गत घेण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय कोणते?

१) पायाभूत सुविधांच्या अमंलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती व त्यांच्या वितरणासाठीच्या धोरणात सुधारणा (गृहनिर्माण विभाग)
२) पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय (सार्वजनिक बांधकाम विभाग)
३) विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय, 35 हजार रुपयांऐवजी 50 हजार रुपये मानधन मिळणार (महसूल विभाग)
४) 14 व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्षे मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता (विधी व न्याय विभाग)
५) मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रा सारखाच दर्जा देण्याचा निर्णय. मच्छिमारी, मत्स्य व्यावसायसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, सवलतीचा लाभ होणार (मत्स्यव्यवसाय विभाग)
६) मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय. स्मारकासाठी 142.60 कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाख रुपयांच्या तरतूदीस मंजूरी. (ग्रामविकास विभाग)
७) गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता. पवनी, जि.भंडारा या प्रकल्पाच्या 25 हजार 972 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
८) राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करणार (कामगार विभाग)

तीन दिवसानंतर एकनाथ शिंदे मुंबईत…

एकिकडे राज्यात दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या तीन दिवसांपासून शिंदे हे साताऱ्यातील दरे मूळ गावी मुक्काम ठोकून होते. तिथे त्यांनी शेतात काम केल्याची फोटो सर्वांनी पाहिले. शेतीत झाडांची लागवड केल्याचा एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण ते मागील ३ दिवसांपासून कोणत्याही शासकीय कामकाजात किंवा शासनाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभाग झाली नव्हते. मात्र गेल्या तीन दिवसांनंतर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला. त्यामुळं एकनाथ शिंदे खरोखरचं नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews