रविवारचा दिवस हा मुंबईकरांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असतो. अशा परिस्थितीत आता मुंबईकरांसाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज रात्री आणि रविवारी मुंबईत लोकल रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रवास करताना चांगली कसरत करावी लागणार आहे. लोकल रेल्वेचे उद्याचे वेळापत्रक नेमके कसे असणार आहे, ते सविस्तर जाणून घेऊ…

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

लोकल ट्रेनेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जाणून घ्या कोणत्या मार्गावर, कुठे आणि किती वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. लोकलने प्रवास करण्यापूर्वी मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहा आणि मगच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर मध्य रेल्वेवर रविवारी दिवसभर ब्लॉक घेण्यात येणार नाहीये. तर पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

लोकलचे वेळापत्रक पाहूनच बाहरे पडा!

मध्य रेल्वेवर विध्याविहार ते ठाणे या मार्गांच्या दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर शनिवारी मध्यरात्री 12.40 ते रविवारी पहाटे 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मेल – एक्सप्रेस अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. परिणामी रात्री उशिराच्या लांब पल्ल्याच्या रेल्वे 14 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गाच्या संबंधित तानशेत रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.30 ते रविवारी पहाटे 5.5 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या वेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच काही लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत तर काही लोकल फेऱ्या 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. अंधेरी बोरिवली लोकल हार्बरमार्गे गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.