MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

कल्याण ग्रामीणमध्ये उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

Written by:Astha Sutar
Published:
गेल्या अडीच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महायुतीच्या काळात स्थगिती सरकारचे सगळे स्पीडब्रेकर काढून टाकले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.
कल्याण ग्रामीणमध्ये उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena – शिवसेना शिंदे गटात आज आणखी तीन माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, उबाठाच्या माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या माजी नगरसेविका शैलजा भोईर, कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास…

दरम्यान, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेविकांनी आज शिवसेनेते प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी कौटुंबिक नाते प्रत्येकजण जपत होता. खासदार  श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात हे पदाधिकारी काम करतात. आज वारकरी संप्रदायाचे देखील लोक आज शिवसेनेत सहभागी झाले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना महायुती सरकारने ४५००० कोटींची मदत केली होती, आताही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रॅंडचा बँड वाजवण्याचे काम जनता करते

मविआ जेव्हा निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि जेव्हा पराभव होते तेव्हा ईव्हीएम खराब, मात्र बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक बॅलट पेपरवर झाली होती, तरी सुद्धा उबाठाचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला पाठिंबा दिला. ८० जागा लढवून ६० जागा आम्ही जिंकलो. काहीजण म्हणत होते एकही जागा निवडून येणार नाही, पण आमचे ६० आमदार निवडून आले. ब्रॅंडचा बँड वाजवण्याचे काम जनता करत असते, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.