Marathi News

तो सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री आणि…, मंत्री कोकाटेंच्या खाते बदलावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Written by:Astha Sutar
Published:
गेल्या काही दिवसापासून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशी विरोधकांकडून मागणी होत होती. तसेच गेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या राजीनामा ऐवजी त्यांचे खाते बदलण्यात यावा, असा मंत्र्यांचा सुर होता.
तो सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री आणि…, मंत्री कोकाटेंच्या खाते बदलावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Eknath Shinde – वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांचे अखेर खातं बदलण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्री हे खातं काढून दत्ता भरणे यांना कृषीमंत्री पद देण्यात आले आहे. तर दुसरीकडे दत्ता भरणे यांचं क्रीडा खातं हे माणिकराव कोकाटे यांना देण्यात आला आहे. या खांदेपालटानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

हा सर्वस्वी निर्णय…

गेल्या काही दिवसापासून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशी विरोधकांकडून मागणी होत होती. तसेच गेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या राजीनामा ऐवजी त्यांचे खाते बदलण्यात यावा, असा मंत्र्यांचा सुर होता. त्यामुळे अखेर गुरुवारी रात्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आलं आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खात्याबद्दल याचा सर्वश्री निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचा आहे. परंतु हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे… शेतकऱ्यांसाठी आहे… विकासकामं अशीच सुरू राहतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

कोकाटेंच्या अडचणी वाढणार?

1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केल्याप्रकरणी राज्याचे माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने  50 हजारांच्या दंडासह दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि कोकाटेंच्या वकिलांची बाजू ऐकून घेत या शिक्षेला स्थगिती देत निकाल राखून ठेवत 1 मार्च ही तारीख दिली होती. पण सत्र न्यायालयाने ही सुनावणी आता 5 मार्चला ठेवली आहे.त्यामुळे कोकाटेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews