Mumbai : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पण त्यापूर्वी महादेवी हत्तीण आणि मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यावरुन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती. दरम्यान, दोन्ही बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कबुतरखाने अचनाक बंद करणं योग्य नाही, कुबतरखान्याबाबत पालिकेनं हायकोर्टात ठाम भूमिका मांडावी, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
कबुतरखान्यासाठी समिती गठीत करणार…
दरम्यान, कबुतरखान्याच जोपर्यंत निर्णय होत नाही, आणि एकही कबुतर मृत्यूमुखी पडू नये, यासाठी मी पालिकेकडे पर्यायी जागेसाठी पत्र लिहिले होते. पण आता आरोग्याच्या दृष्टीने ज्या सूचना आहेत, त्या कमिटी आणि पालिका सांगेल. कुबतरखान्याच्या ठिकाणी जी घाण होत होती, ती साफ करण्यासाठी मशीनचा वापर केला जाईल, जेणेकरुन लोकांना कोणताही त्रास होणार नाही. याची खबरदारी घेण्यात येईल, असं बैठकीनंतर मंत्री मंगलप्रभात लोढांनी सांगितले. कबुतरांना कोणी खाऊ टाकल्यामुळं जर कोणाला त्रास होत असेल तर त्याबाबत खबरदारी म्हणून अद्यावत तांत्रिक मशीनचा वापर करुन, फिडींग आणि जी घाण आहे, ती साफ करण्यात येईल, असं मंत्री लोढांनी सांगितले.
कबुतरखाने बंद करणं योग्य नाही – मुख्यमंत्री
दुसरीकडे आज मुंबईतील कबुरतखान्याबात देखील मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. तर कबुतरखाने बंद होऊ नये, यासाठी मुंबई पालिका प्रशासन हायकोर्टात बाजू मांडणार आहे. तसेच यासाठी एक समिती गठीत केली जाणार आहे. ज्या कबुतरखान्याच्या ठिकाणी पाण्याची नळजोडणी तोडली होती, ती पुन्हा सुरु करणार आहे. दरम्यान, कबुतरखाना अचनाक बंद करणं योग्य नाही, कुबतरखान्याबाबत पालिकेनं हायकोर्टात ठाम भूमिका मांडावी, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे. तसेच अचानक कबुतरखाने बंद करणे बरोबर नाही, असं बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबईतील कबुरतखाने बंद होऊ नये, यासाठी जी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली, त्याबद्दल आम्ही हिंदू समाज, जैन समाज आणि सर्व अहिंसक समाजातर्फे मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असं मंत्री मंगलप्रभात लोढांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.





