Pune Palkhi 2025: जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचा आज पुण्यात संगम, २ दिवसांचा मुक्काम कसा असणार?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
पालखी मार्गावरील वैद्यकीय सेवा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, अग्निशामन व्यवस्था आधी सुविधांचे नियोजन याची जय्यत तयारी झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आजपासून २ दिवस पुणे मुक्कामी असणार आहे. त्यामुळे पालख्यांची ओढ भक्तांना लागली आहे.
Pune Palkhi 2025: जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचा आज पुण्यात संगम, २ दिवसांचा मुक्काम कसा असणार?

Pune Palkhi 2025 : पंढरपूरची वारी हे भक्तांसाठी एक पर्वणी असते. वारी करण म्हणजे जन्माला आल्याचे सार्थक होणे, अशी भावना भक्तामध्ये आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटले जाते. पंढरपूरचा विठ्ठल हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. दरम्यान, आता पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध विठ्ठल भक्तांना लागले आहेत. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.

या वारीमध्ये अनेक संतांच्या पालख्या सामील होत असतात. आज  संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी यांचे संगम पुण्यात होणार आहे. त्यामुळं पुण्यात आज भक्तांची मांदियाळी जमली आहे.

पालखांचा पुण्यात २ दिवस मुक्काम…

दरम्यान, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज (शुक्रवारी) पुणे शहरात दाखल होत आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागताची तयारी पालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. तसेच पुण्यात दोन दिवस भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे लक्षात घेऊन भक्तांची तशी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध, पालखी मार्गावर आरोग्य कक्ष आणि फिरती शौचालये आदी व्यवस्था पालिकेसह विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून करण्यात येणार आहे. तसेच पालखांच्या स्वागताची संपूर्ण तयारी झाली आहे.

पालख्यांचा स्वागत मार्ग कसा आहे?

  • जगतगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने पुण्यात दाखल
  • संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिघी, विश्रांतवाडी, संगमवाडी रस्त्याने शहरात दाखल
  • पालिका आयुक्त नवल किशोर राम दोन्ही पालख्याचे दर्शन घेऊन शहरात स्वागत होणार
  • ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणार
  • संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे
  • शनिवारी दिवसभराच्या मुक्कामानंतर रविवारी (२२ जूनला) पहाटे दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होणार