साउथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ऋषभ शेट्टी यांचा नवा चित्रपट ‘कंतारा: चैप्टर 1’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, अॅडव्हान्स बुकिंगने आतापर्यंत जोरदार प्रतिसाद मिळवला आहे. अवघ्या काही तासांत हा चित्रपट थेट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहांमध्ये गर्दी वाढत असताना, या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू (Kantara Chapter 1 Review) देखील समोर आला आहे. त्यामुळे ‘कंतारा: चैप्टर 1’ प्रेक्षकांच्या अपेक्षांवर उतरतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चित्रपट समीक्षक कुलदीप गढवी यांनी या चित्रपटाबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ‘कंतारा: चैप्टर 1’ पाहिल्यानंतरचं मत व्यक्त केलं. त्यांच्या मते हा चित्रपट पूर्णपणे अंगावर शहारे आणणारा आणि प्रेक्षकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे.
कुलदीप गढवी म्हणाले, “मी नुकताच ‘कंतारा: चैप्टर 1’ पाहिला. या चित्रपटाचा एकूण कालावधी २ तास ४८ मिनिटांचा आहे. चित्रपटाची सुरुवात काहीशी संथ वाटू शकते, पण दुसरा भाग सुरू होताच कथेला मिळणारी गती आणि तीव्रता प्रेक्षकाला खिळवून ठेवते. ही एक अत्यंत जबरदस्त सिनेमॅटिक अनुभूती आहे. Kantara Chapter 1 Review
ते पुढे म्हणतात, “चित्रपटाचा पहिला भाग थोडा हळू असला, तरी दुसऱ्या भागात जी पकड निर्माण होते, ती प्रेक्षकाला वेगळ्याच स्तरावर नेते. ऋषभ शेट्टी यांचा अभिनय पुन्हा एकदा जबरदस्त असून, त्यांनी दाखवलेली प्रतिभा हा चित्रपट विशेष बनवते. या एकूण अनुभवानंतर गढवी यांनी ‘कंतारा: चैप्टर 1’ ला ५ पैकी ४ स्टार्स दिले आहेत. त्यांच्या मते हा चित्रपट केवळ एक कथा नाही, तर एक संपूर्ण अनुभव आहे, जो बॉक्स ऑफिसवर मोठा प्रभाव पाडेल.
स्टोरी काय आहे?
‘कंतारा: चैप्टर 1’ ही कथा प्राचीन कदंब वंशातील काळात घडते. चित्रपटात कादुबेट्टू शिव या प्रमुख पात्राची उत्पत्ती आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घटना दाखवल्या आहेत. ही कथा जंगल, संस्कृती आणि विस्मरणात गेलेल्या इतिहासाच्या खोल गाभ्यात घेऊन जाते. चित्रपटातील वातावरण, संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि कथा मांडणी पूर्णपणे पारंपरिक, रॉ आणि प्रभावशाली आहे. ऋषभ शेट्टी यांनी यावेळी केवळ अभिनयच नाही, तर एक प्रभावी विश्व उभं केलं आहे. ‘कंतारा’ ही मालिका केवळ एक फ्रँचायझी नसून, त्यामागे एक सशक्त दृष्टीकोन आहे, जो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
फेल की पास Kantara Chapter 1 Review
चित्रपट केवळ मनोरंजन देत नाही, तर तो आपल्याला आपल्या मुळांशी जोडतो आणि विसरलेल्या इतिहासाची नाळ पुन्हा उलगडतो. म्हणूनच हा चित्रपट प्रत्येक चित्रपटप्रेमींनी थिएटरमध्ये जाऊन अनुभवावा, असं मत अनेक समीक्षक व्यक्त करत आहेत. सुरुवातीच्या रिव्ह्यूवरून (Kantara Chapter 1 Review) असं दिसतंय की ‘कंतारा: चैप्टर 1’ प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या अपेक्षांवर नक्कीच उतरतो आहे. ऋषभ शेट्टी यांचा दमदार अभिनय, अनोखी कथा, प्रभावी सादरीकरण आणि सांस्कृतिक मांडणी यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवण्यास पात्र ठरू शकतो.






