मराठी सिनेमासाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ खट्याक’? येरे येरे पैसा 3 सिनेमाला स्क्रीनिंग न मिळाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
येरे येरे पैसा ३ ला मुंबईतच सिनेमागृह मिळत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा मराठी-हिंदी असा वाद चिघळण्याची शक्यता आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
मराठी सिनेमासाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ खट्याक’? येरे येरे पैसा 3 सिनेमाला स्क्रीनिंग न मिळाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया

Mumbai – राज्यात मराठी सिनेमासाठी पुन्हा एकदा ‘खळ्ळ खट्याक’ होण्याची शक्यता आहे. येरे येरे पैसा – 3 हा मराठी सिनेमा प्रसिद्ध झाला आहे. मात्र दुसरीकडे सैयारा सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. सैयारा सिनेमामुळे येरे येरे पैसा ३ या मराठी सिनेमाला स्क्रीनिंग मिळत नाही आहे, त्यामुळे मुंबईत मराठी सिनेमाला स्क्रीनिंग मिळत नसल्यामुळे यावर पडसाद उमटताना दिसत असून, यावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येताना दिसताहेत.

मल्टिप्लेक्सच्या काचा फुटतील…

मराठी सिनेमाला स्क्रीन मिळावी म्हणून सरकार दरबारी जावं लागण हेच दुर्दैवी आहे. माझ्यावर असलेला राग मल्टिप्लेक्स वाल्यांनी या सिनेमावर काढला आहे. संजय राऊतांनी केलेल्या पोस्टवर खोपकरांनी आभार मानलेत. तर मंत्री नितेश राणेंच्या भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊतांनीही पक्ष न बघता ट्विट केलं. सुशांत शेलारांनीही आंदोलन केलं आहे. मात्र इथून पुढे मल्टिप्लेक्सच्या काचा फुटतील. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा दिला आहे.

मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल…

“मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत, लढत येत आहेत तरीही प्रश्न काही संपत नाहीत, सैयारा या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून- “येरे येरे पैसा ३”या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले, हे नेहमीचेच झाले आहे, मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल, मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत”, असं पोस्टमध्ये राऊतांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या तोंडावर….

मुंबईत जर मराठी सिनेमा लागत नसतील, त्यांनी आमच्याकडे यावे. सरकार म्हणून आम्ही बसलो आहोत. आम्ही त्यांना नक्की मदत करू जर ते आमच्याकडे आले तर आम्ही डिस्ट्रीब्यूटरशी आम्ही बोलू. मराठी सिनेमा लागत नसेल त्यांनी सरकारकडे यावे, नक्कीच मदत करू, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे. तर मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नाही आहे. यावर बोलताना मंत्री उद्या सामंत म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर आणि आगामी पालिका निवडणूक तोंडावर असले मुद्दे मुद्दामहून निर्माण केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.