Marathi News

कोकण रेल्वे अधिक कार्यक्षम होणार; लोहमार्ग रूंद होणार, गाड्यांची संख्या वाढणार

Written by:Rohit Shinde
Published:
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम आता वेग घेत आहे. नैसर्गिक आव्हानांवर मात करत कोकण रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाला गती दिली असून भविष्यात या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.
कोकण रेल्वे अधिक कार्यक्षम होणार; लोहमार्ग रूंद होणार, गाड्यांची संख्या वाढणार

कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांमधून जाणारी एक महत्त्वाची रेल्वे सेवा आहे. ही रेल्वे समुद्रकिनाऱ्यालगत डोंगर, बोगदे व पूलांमधून जाते. निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी प्रवासी ही रेल्वे प्राधान्याने निवडतात. पावसाळ्यात कोकण रेल्वेचे सौंदर्य अधिक खुलते. ही रेल्वे प्रवास सुखकर करते. कोकण रेल्वे मार्गाची सुरुवात झाली त्याला आता जवळपास 25 वर्षे उलटून गेली आहेत, तरीही हा मार्ग अजूनही एकेरीच आहे. यामुळे गाड्यांची संख्या मर्यादित राहिली असून वेळेच्या अचूकतेवरही परिणाम होत आहे. सध्या या मार्गावर दररोज 55 प्रवासी गाड्या आणि 17 मालगाड्या धावतात. हा मार्ग अधिक कार्यक्षम करण्याची मागणी जूनी आहे.

कोकण रेल्वे होणार वेगवान

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम आता वेग घेत आहे. नैसर्गिक आव्हानांवर मात करत कोकण रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाला गती दिली असून भविष्यात या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे प्रवाशांना लवकरात लवकर आणि अधिक सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गाची सुरुवात झाली त्याला आता जवळपास 25 वर्षे उलटून गेली आहेत, तरीही हा मार्ग अजूनही एकेरीच आहे. यामुळे गाड्यांची संख्या मर्यादित राहिली असून वेळेच्या अचूकतेवरही परिणाम होत आहे. सध्या या मार्गावर दररोज 55 प्रवासी गाड्या आणि 17 मालगाड्या धावतात. परंतु प्रवाशांची संख्या सतत वाढत असल्याने गाड्यांची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे तिकीट आरक्षणात अडचणी, गर्दी आणि गाड्यांना विलंब अशा समस्यांना समोरे जावे लागत आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकणवासियांना दिलासा मिळणार

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खेड-रत्नागिरी, कणकवली-सावंतवाडी आणि मडगाव-ठोकुर हे तीन प्रमुख टप्पे योजनेत समाविष्ट आहेत. या टप्प्यांच्या विस्तारीकरणाचा सविस्तर अहवाल लवकरच रेल्वे मंडळाकडे सादर केला जाईल. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडे निधीचा प्रस्ताव ठेवला जाईल आणि मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

कोकण रेल्वेच्या या दुहेरीकरण प्रकल्पासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक आवश्यक आहे. सपाट भागात दर किलोमीटरसाठी 15 ते 20 कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे, तर बोगद्यांच्या भागात हा खर्च 80 ते 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज आहे. याआधी रोहा ते वीर या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 530 कोटी रुपयांचा खर्च आला होता. हा अनुभव पुढील टप्प्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांना जोडणारी ही रेल्वे सेवा ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांसाठी जीवनरेषा ठरते. पूर्वी जेथे प्रवासासाठी अनेक तास लागायचे, तिथे आता कोकण रेल्वेमुळे वेळ वाचतो. विद्यार्थ्यांपासून ते कामगारांपर्यंत सर्वांसाठी ही सोयीस्कर व स्वस्त वाहतूक व्यवस्था आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात गावाकडे जाण्यासाठी ही रेल्वे अधिक उपयुक्त ठरते. पर्यटनदृष्ट्या देखील ही रेल्वे फारच लोकप्रिय आहे, कारण प्रवासादरम्यान कोकणचे निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळते. कोकण रेल्वेने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना दिली असून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews