Marathi News

नियोजनाचा अभाव विक्रोळीत वाहतूक कोंडी वाढली, उड्‌डाणपुलाच्या उ‌द्घाटनानंतर नागरिकांच्या संतप्त भावना

Written by:Astha Sutar
Published:
या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यामु‌ळे यावर तोडगा काढण्यासाठी खा. संजय दिना पाटील यांनी वाहतक विभाग व पालिकेशी पत्रव्यवहार करुन या समस्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरीकांच्या समस्याकडे लक्ष देण्याऐवजी घाईने पुलाचे उदघाटन करुन श्रेय घेण्यासाठी भाजपने स्टंटबाजी केल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.
नियोजनाचा अभाव विक्रोळीत वाहतूक कोंडी वाढली, उड्‌डाणपुलाच्या उ‌द्घाटनानंतर नागरिकांच्या संतप्त भावना

Vikhroli Bridge – विक्रोळी येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा घाईगडबडीत करण्यात आला. केवळ श्रेय घेण्यासाठी भाजपने या ठिकाणी स्टंटबाजी केली. उड्डाणपुल सुरु झाल्याने विक्रोळी पुर्वेला वाहतुक कोंडीची समस्या वाढली असून, याकडे कोणालाही लक्ष द्‌यायला वेळ नाही. याबाबत खासदार संजय दिना पाटील यांनी वाहतुक विभाग तसेच महानगर पालिकेला पत्राव्दारे वारंवार कळविले आहे.

वाहतूक कोंडी वाढली…

उड्‌डाणपुल झाल्यानतर पुर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोडी मोठ्‌या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्यासाठी हा पुल आता डोकेदुखी ठरत आहे. विक्रोळी येथील उड्डाणपुल झाल्यानंतर नागरीकांच्या वेळेत आणि पैशात बचत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र उड्डाणपुल झाल्यानंतर पश्चिमेकडून पूर्वेला आल्यानंतर टागोर नगर, पूर्व दुतगती महामार्गावर रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे घाईघाईने उद्‌घाटन करण्याऐवजी लोकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नागरीकाचे म्हणणे आहे.

वाहतूक विभागाकडे तक्रार

दरम्यान, याबाबत विक्रोळीकर विकास मंचाने वाहतुक विभागाकडे तक्रार केली असून टागोर नगर आणि कन्नमवार नगर या दोन्ही मार्गावर रस्ता दुभाजक लावण्यात यावा, किमान ६ वाहतुक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी. टागोर नगरला जाणारी वाहतुक रेल्वे स्टेशन मार्गे टागोर नगरला वळविण्यात यावी, जड वाहनांना या पुलावरुन येण्यास बंदी घालण्यात यावी. नवीन पुलाच्या खाली पूर्व दुतगती मार्गावर सिग्नल लावण्यात यावा, या मागण्या स्थानिक नागरीकानी आपल्या पत्रात केल्या आहेत.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews