लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आणि मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणपती म्हणून ओळखणाऱ्या लालबागच्या राजाच्या मूर्ती विसर्जनात (Lalbaugcha Raja Visarjan 2025) मोठं विघ्न समोर आलं आहे. विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असतानाही लालबाग च्या राजाची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे विसर्जनाला विलंब झाला आहे. हा तराफा खास गुजरात वरून मागवण्यात आला होता. मात्र याच नव्या तराफ्यावर मूर्ती योग्य प्रकारे बसत नसल्याने विसर्जन रखडल्याचे पाहायला मिळत आहे.
मूर्ती तराफ्यावर चढवताना अडचणी – Lalbaugcha Raja Visarjan 2025
लालबागचा राजा विसर्जनसाठी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मंडपातून निघाला होता. आज सकाळी लालबागचा राजा पावणेआठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यानंतर लालबागचा राजाची आरती होऊन तो तराफ्यावर बसून समुद्रात नेला जाईल, असे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी मुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला मोठा विलंब होत आहे. खरं तर यंदा बाप्पाच्या विसर्जनासाठी (Lalbaugcha Raja Visarjan 2025) आधीपेक्षा दुप्पट आकाराचा अत्याधुनिक तराफा दाखल करण्यात आला आहे. हा तराफा खास गुजरातहून तयार करुन आणल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा प्रचंड हलत होता. त्यामुळे लालबागचा राजाची मूर्ती त्यावर चढवण्यात आली नाही.
गणेशभक्तामध्ये चिंतेचा वातावरण
हे ही वाचा
याशिवाय आता भरतीची वेळ आहे. भरतीमुळे गिरगाव समुद्रात पाणी वाढत असल्याने लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढविण्यात अनेक अडचणी येत आहेत. अनेक प्रयत्न करूनही या अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रशासनाचे अधिकारी एकत्रितपणे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आताच्या माहितीनुसार, लालबागचा राजाचे विसर्जन होण्यास यंदा वेळ लागणार आहे. समुद्राला भरती आल्यामुळे गणपतीची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अडचण होत आहे. सर्व बोटी दूर झाल्या आणि समुद्राची भरती ओसरली की मग लालबागच्या राजाचे विसर्जन होणार आहे.