Marathi News

लंडनमध्ये मराठी माणसासाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार, सरकारकडून ५ कोटींचा निधी मंजूर

Written by:Astha Sutar
Last Updated:
लंडनमधील मराठीजनांबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. लंडनमधील मराठीजनाना आपल्या हक्काचे आणि स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, यासाठी आता महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे.
लंडनमध्ये मराठी माणसासाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार, सरकारकडून ५ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Bhavan – गेल्या कित्येक वर्षांपासून लंडनमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात यावे, या मागणीला जोर धरत होता. तथापि आता ही मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेकडून ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात यावे यासाठी प्रयत्न चालू होते. दरम्यान, लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करुन तेथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार आहे. त्यामुळं आता लंडनमधील मराठीजनांना स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळणार आहे.

1 लाखाहून अधिक मराठी बांधव लंडनमध्ये…

दरम्यान, लंडनमधील महाराष्ट्र मंडळ ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून लंडन आणि आसपासच्या मराठी बांधवांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणणे, महाराष्ट्राची संस्कृतीचे जतन करणे आदी उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जाताहेत. दुसरीकड़े गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र मंडळाच्या स्थापने पासूनच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची वास्तू ही भाडेतत्त्वावर होती. त्यामुळे मराठीजनांसाठी स्वतःच्या मालकीचे महाराष्ट्र भवन असावे, अशी लंडनमधी मराठीजनांची मागणी होती.

सध्या लंडन आणि परिसरातील 1 लाखाहून अधिक मराठी बांधव या महाराष्ट्र मंडळाशी जोडले गेले आहेत. महाराष्ट्र भवनामुळे मराठी साहित्य, कला, नृत्य, परंपरा, संगीत आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात सांस्कृतिक आदान-प्रदानाला चालना मिळेल.

गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र भवनाची भेट…

गेल्या ९३ वर्षांपासून महाराष्ट्र मंडळ ही संस्था विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव आणि सामाजिक उपक्रम राबवत आहे. १९३२ रोजी महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी या महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली होती. भारताबाहेरील आणि युनायटेड किंगडममधील सर्वात जुन्या मराठी संस्थांपैकी महाराष्ट्र मंडळ ही एक संस्था जुनी आहे. दरम्यान, लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’साठी राज्य सरकारकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सरकारच्या या निर्णयामुळं महाराष्ट्र शासनाने लंडनमधील मराठीजनांना गणेशोत्सवानिमित्त ही भेट दिल्याचे बोलले जातं आहे. त्यामुळं लंडनमधील महाराष्ट्र मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. दरम्यान,

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews