महाराष्ट्रातील हे शहर आहे झणझणीत मटणासाठी प्रसिद्ध

Published:
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मांसाहार हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक आहे. अनेकांना तर सतत मांसाहार हा लागतोच. कधी एकदा ताटात मटण येते आणि त्याच्यावर आम्ही ताव मारतोय असं अनेकाना होत असतं.
महाराष्ट्रातील हे शहर आहे झणझणीत मटणासाठी प्रसिद्ध

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मांसाहार हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक आहे. अनेकांना तर सतत मांसाहार हा लागतोच. कधी एकदा ताटात मटण येते आणि त्याच्यावर आम्ही ताव मारतोय असं अनेकाना होत असतं.. महाराष्ट्रात मांसाहार करणारी लोकही वेगवेगळ्या कॅटेगरीत पडतात. कोणाला मटन आवडतं, कोणाला मासे आवडतात , तर कोण फक्त अंडी खातो. कोकण किनारपट्टीवर मासे आणि समुद्री पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. मालवणी आणि आगरी संस्कृतीत मांसाहाराला विशेष स्थान आहे. मासे, कोळंबी आणि खेकडे यांचा वापर येथे अधिक दिसून येतो.

विदर्भाचे सावजी मटण

विदर्भातील नागपूर शहरातील ‘सावजी’ खाद्यसंस्कृती झणझणीत आणि तिखट मांसाहारासाठी प्रसिद्ध आहे. नागपूरसह विदर्भातील इतर भागांतही मांसाहार केला जातो.

कोल्हापूर मांसाहार साठी प्रसिद्ध

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे मांसाहाराचे प्रमुख केंद्र मानले जाते. येथील तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा हे मटणाचे प्रकार राज्यभर लोकप्रिय आहेत. पुणे शहरात सुद्धा मांसाहारी हॉटेलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

दरम्यान, भारतातील एकूण मांस उत्पादनात महाराष्ट्राचा 12.25 टक्के वाटा असून राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच महाराष्ट्रातील सुमारे 77 टक्के मांसाहारी नागरिकांची पहिली पसंती चिकनला असल्याची माहिती समोर आली आहे. तिखट आणि मांसाहारासाठी कोल्हापूर हे शहर आघाडीवर असून त्यापाठोपाठ नागपूरचा क्रमांक लागतो.