Maharashtra Rain Updates : सावध रहा रे!! पुढील 3 दिवस धुव्वाधार पाऊस; या जिल्ह्यांना येलो अलर्ट

Published:
शेतकऱ्यांना आधीच पावसाचा मोठा फटका बसला आहे, त्यातच सध्या अनेक ठिकाणी धानाची कापणी सुरू आहे, तसेच कापसाची वेचणी देखील सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडल्यास त्याचा मोठा फटका हा धान आणि कापसाला बसू शकतो
Maharashtra Rain Updates : सावध रहा रे!! पुढील 3 दिवस धुव्वाधार पाऊस; या जिल्ह्यांना येलो अलर्ट

महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्तच पाऊस (Maharashtra Rain Updates) पडला. विदर्भ असो, मराठवाडा असो वा कोकण किनारपट्टी असो पावसाने सर्वत्र हौदोस घातला. पावसामुळे अनेक भागात अतिवृष्टी झाली, हाता तोंडाशी आलेले पीक वाहून गेले. बळीराजा पुरता उध्वस्त झाला. आता कुठे पाऊस गेला असे वाटत असतानाच टाकतोय आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस कोसळला असतानाच आता पुढील 3 दिवस सुद्धा अनेक भागात धुव्वाधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोणत्या दिवशी कुठे कुठे पाऊस पडणार? (Maharashtra Rain Updates)

24 ऑक्टोबर

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर.

25 ऑक्टोबर

पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, बीड, जालना, धाराशीव, वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली. (Maharashtra Rain Updates)

26 ऑक्टोबर

पुणे, सातारा घाट, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

बळीराजा चिंतेत –

शेतकऱ्यांना आधीच पावसाचा मोठा फटका बसला आहे, त्यातच सध्या अनेक ठिकाणी धानाची कापणी सुरू आहे, तसेच कापसाची वेचणी देखील सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडल्यास त्याचा मोठा फटका हा धान आणि कापसाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाऊस पडू नये अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews