एका शेतकऱ्याच्या पोराला हरवायला महाविकास आघाडी लढली, शिवसेना प्रवेशानंतर चंद्रहार पाटील यांची मविआवर टीका

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
क्रीडा क्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे. 
एका शेतकऱ्याच्या पोराला हरवायला महाविकास आघाडी लढली, शिवसेना प्रवेशानंतर चंद्रहार पाटील यांची मविआवर टीका

Chandrahar Patil : शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूक ठाकरे गटातून लढवलेले डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज अखेर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या सेनेकडून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. यानंतर आता त्यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. याबाबत पाटील यांनी सोशल मीडियावरुन काल माहिती दिली होती. प्रवेशानंतर पाटील यांनी मविआवर निशाणा साधला आहे.

आमच्या जिल्ह्याला घराणेशाहीची कीड…

दरम्यान, चंद्रहार पाटील यांचा शिंदेंच्या सेनेतील प्रवेशानंतर पाटील यांनी मविआवर निशाणा साधला आहे. माझ्यासोबत आज ५० ते ६० बस याठिकाणी आल्या आहेत. उदय सामंत यांना आयडॉल म्हणून पहायचो.  २००७ सालीअनिल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापरिषद लढलो, माझा आक्षेप महाविकास आघाडीविषयी आहे. एका शेतकऱ्याच्या पोराला हरवायला महाविकास आघाडी विरुद्ध मी लढलो.  मी एकटा लढलो लोकसभा निवडणुकीत ६० हजार मत मिळविली. घराणेशाहीची कीड लागलेला आमचा जिल्हा आहे. असं म्हणत चंद्रहार पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टिका केली.

मी कुस्ती क्षेत्रातला २ वेळा मुख्यमंत्री

दुसरीकडे मी कोणत्याही पदाच्या अपेक्षा ठेवून आले नाही. मी कुस्ती क्षेत्रातला दोन वेळा मुख्यमंत्री आहे.  १५ -२० वर्ष कष्ट केले म्हणून महाराष्ट्र केसरी जिंकलो, असं पाटील म्हणाले. शिंदे गटातील प्रवेशाची माहिती पैलवान चंद्रहार पाटील यांनी एक्स अकाउंटवरून एक पोस्ट करत काल दिली होती. तर गेल्या आठवड्यात मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडून चंद्रहार पाटील हे आमच्याकडे येतात, अशी माहिती दिली होती. यानंतर आज अखेर शिंदेंच्या गटात चंद्रहार पाटील यांनी प्रवेश केला आहे.