Mahayuti Manifesto For BMC Election 2026 : BMC निवडणुकीसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध; मुंबईकरांसाठी मोठमोठ्या घोषणा

Published:
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस यांच्या महायुतीने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे
Mahayuti Manifesto For BMC Election 2026 : BMC निवडणुकीसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध; मुंबईकरांसाठी मोठमोठ्या घोषणा

Mahayuti Manifesto For BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस यांच्या महायुतीने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. ठाकरे बंधूंनी यापूर्वीच आपल्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी मोठ-मोठी आश्वासने दिल्यानंतर महायुतीकडून नेमक्या कोणकोणत्या घोषणा करण्यात येणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलं होतं.

शिंदे फडणवीस यांची उपस्थिती (Mahayuti Manifesto For BMC Election 2026)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे प्रमुख रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. मुंबईला प्रदूषण मुक्त आणि मुंबई खड्डे मुक्त आम्ही करणार आहोत. असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. Mahayuti Manifesto For BMC Election 2026

काय आहे महायुतीचा जाहीरनामा

मुंबईचा पाणीपुरवठा वाढवण्यासाठी पुढील ५ वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार
– पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत १७ हजार कोटी रुपये
– बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
पुर्नविकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी जाहीर केलेली योजना जलदगतीने राबविणार
– विकसित मुंबईसाठी २०३४ चा आराखडा तयार होणार
– फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार
– लघु उद्योग धोरण राबवले जाणार
– बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस
– बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत
– बेस्ट बसेसची संख्या ५ हजारवरुन १० हजारांवर जाणार
– स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार
– लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी व लघु उद्योग स्थापन करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
– रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार
– पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार
– मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार
– बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आणि आर्थिक तरतूद राबवली जाणार
सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार
– पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार
– हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणार
– रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुर्नविकास करणार आणि गरज पडल्यास ३ नवीन नाट्यगृहे उभारणार