देव त्यांना सद्बुद्धी देवो…, पुढेही एकत्र राहो, उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया

Written by:Astha Sutar
Published:
दोन भाऊ गणेश उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे. एकत्र आल्याने कुटुंबाला आनंद होतो. एकत्र आले ही चांगलीच गोष्ट आहे. मी याआधीही म्हटलं होतं की, दोन भाऊ एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे.
देव त्यांना सद्बुद्धी देवो…, पुढेही एकत्र राहो, उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया

Uddhav-Raj – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी दिड दिवसांचा घरी असतो. बुधवारी (27 ऑगस्ट) मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे सहकुंटंब जात शिवसेना गणपतीचं दर्शन घेतलं. दरम्यान, तब्बल 22 वर्षांनी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्तानं आले होते.दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील गेल्या काही दिवसांपासून भेटी वाढत असल्यामुळे ते आगामी पालिका निवडणुकीत युती होणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असताना, आज उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या घरी गणेशोत्सवानिमित्त गेले होते. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

पुढेही एकत्र राहो…

दरम्यान, उद्धव ठाकरे हे तब्बल २२ वर्षानंतर राज ठाकरेंच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले, यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येताहेत. देव त्यांना सद्बुद्धी देवो…. दोन भाऊ एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे… दोन भाऊ गणपती बाप्पाच्या निमित्ताने का होईना पण एकत्र आले आहेत. आणि हे कायमस्वरूपी एकत्र राहो…. देव बाप्पा, गणपती त्यांना सद्गबुद्धी देवो…, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात असे किती भाऊ एकत्र येत असतात

तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे काय झालं… महाराष्ट्रात असे कित्येक भाऊ एकत्र येत असतात. आम्ही कुणाकडे जायचं असेल तर मुर्हूत पाहून जात नाही… त्यामुळे एकमेकाकडे देवाच्या दर्शनाला गेले आहेत. यात काय एवढं मोठं नाही. अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली आहे.

चांगली गोष्ट आहे

तर दोन भाऊ गणेश उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे. एकत्र आल्याने कुटुंबाला आनंद होतो. एकत्र आले ही चांगलीच गोष्ट आहे. मी याआधीही म्हटलं होतं की, दोन भाऊ एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.